महाराष्ट्र एसटी महामंडळ

एसटीच्या तिजोरीत 66 कोटींची भर; तोटा कमी होण्याची चिन्हे

Maharashtra ST Bus: एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण आढावा बैठका, अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा सकारात्मक परिणाम

एसटीच्या तिजोरीत 66 कोटींची भर; तोटा कमी होण्याची चिन्हे

Maharashtra ST Bus

मुंबई (Maharashtra ST Bus) : एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण आढावा बैठका आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात तब्बल 66 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उत्पन्नवाढीसाठी सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याने एसटीच्या तोट्याचे प्रमाणही कमी होत आहे.

आगामी काही महिन्यांत (Maharashtra ST Bus) एसटीचा चालू तोटा भरून काढण्याच्या दिशेने महामंडळाची वाटचाल सुरू असल्याचा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. एसटीचे प्रत्येक आगार हे त्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना प्रवासी सेवा देण्यासाठी कार्यरत आहे. एसटीच्या एकूण प्रवाशांपैकी तब्बल 85 टक्क्यांहून अधिक प्रवासी 100 किलोमीटरच्या आतील अंतरात प्रवास करतात. त्यामुळे प्रत्येक आगाराने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रवाशांच्या गरजा आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन वाहतूक नियोजन करणे आवश्यक आहे.

ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक आगाराने प्रवाशांची प्रत्यक्ष उपलब्धता आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यास सुरुवात केली. ग्रामीण तसेच निमशहरी भागातील नोकरदार, शेतकरी, महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासाच्या वेळांचा विचार करून बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. यासोबतच आठवडी बाजार, यात्रा-जत्रा तसेच स्थानिक पातळीवरील गर्दीचे दिवस लक्षात घेऊन संबंधित मार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत.

31 ऑगस्टला एसटीचे विक्रमी उत्पन्न

विविध उपाययोजनांसोबतच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर 31 ऑगस्ट रोजी एसटीला आतापर्यंतचे सर्वाधिक दैनंदिन उत्पन्न मिळाले. या दिवशी तब्बल 45 कोटी रुपयांची तिकीट विक्री झाली. विशेष म्हणजे, (Maharashtra ST Bus) एसटीच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रमी उत्पन्नाची नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी काळातही उत्पन्नवाढीचा हा वेग कायम राहिल्यास एसटीचा चालू तोटा कमी होऊन तो भरून काढण्याची आशा निर्माण झाली आहे.

संबंधित सामग्री

ST प्रवाशांसाठी मोठी अपडेट! महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य

ST प्रवाशांसाठी मोठी अपडेट! महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य

१ ऑक्टोबरपासून ST सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य होणार. महिला व ज्येष्ठ नागरिकांना QR पावती, BHIM App आणि OTPची सुविधाही मिळणार.

Sep 29, 2026
स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी गावाजवळ एसटी बस पलटली.

Sep 18, 2026
हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोलीतील राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीआधारे १३ कोटी ३४ लाख ९१ हजार ८८२ रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. ६७८ प्रकरणांचा निपटारा झाला.

Sep 13, 2026
उद्या १ सप्टेंबर पासून NCMC कार्ड अनिवार्य, एसटी महामंडळाचे आदेश जारी

उद्या १ सप्टेंबर पासून NCMC कार्ड अनिवार्य, एसटी महामंडळाचे आदेश जारी

ST NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सवलतीच्या प्रवासाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दि. १ सप्टेंबर २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना सवलत

Aug 31, 2026
थकीत बिलांचा ताण? मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांचा आत्महत्येचा निर्णय

थकीत बिलांचा ताण? मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांचा आत्महत्येचा निर्णय

काम पूर्ण करूनही थकीत बिलांची रक्कम वेळेत न मिळाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Aug 26, 2026