महाराष्ट्र शालार्थ आयडी घोटाळा

₹160 कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई; आरोपी भाजपच्या नेत्याला अटक

Maharashtra Shalarth ID Scam: राज्यात गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि भाजप पदाधिकारी संजय गरुडला अटक

₹160 कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई; आरोपी भाजपच्या नेत्याला अटक

Maharashtra Shalarth ID Scam

मुंबई (Maharashtra Shalarth ID Scam) : राज्यात गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि भाजप पदाधिकारी संजय गरुड (Sanjay Garud) याला नाशिक पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून अटक केली आहे. या प्रकरणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी अटक मानली जात आहे.

841 शिक्षकांच्या नावांचा कथित गैरवापर

पोलिसांच्या माहितीनुसार, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 841 शिक्षक व (Shalarth ID Scam) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर करण्यात आला. तपासात आरोपीच्या 15 शैक्षणिक संस्थांमधील 177 शिक्षक व कर्मचाऱ्यांना बनावट वैयक्तिक मान्यता देण्यात आल्याचे समोर आले आहे.

₹160 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

बनावट शालार्थ आदेशांच्या (Shalarth ID Scam) आधारे शासनाची सुमारे ₹160 कोटींची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, 200 हून अधिक शाळांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

माजी शिक्षणाधिकाऱ्यालाही अटक

या (Shalarth ID Scam) घोटाळ्याप्रकरणी जळगावचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांनाही एसआयटीने अटक केली आहे. त्यांनी 2011 ते 2015 या कालावधीत अनेक शिक्षकांना कथित बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचा आरोप आहे. तपासात या प्रकरणात शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेचाही शोध घेतला जात आहे.

संजय गरुड कोण?

संजय गरुड (Sanjay Garud) यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवली असून, जानेवारी 2024 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते एका शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक आणि अध्यक्ष असून, त्यांच्या संस्थेतील शिक्षकांच्या नावानेही कथित बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. या प्रकरणातील आरोपांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, अंतिम निर्णय येणे बाकी आहे.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी 11 पोलिसांवर FIR. मानवाधिकार आयोगानंतर तपास CIDकडे.

Sep 24, 2026
अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाठीचार्जाचा आरोप; दीपक वागसकर यांच्या मृत्यूनंतर तणाव. कार्यकर्त्यांकडून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.

Sep 24, 2026