GSDA, महावितरण, जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास प्रकल्पांमध्ये नव्या नियुक्त्या; रवींद्र खेबुडकर यांची आयुक्तपदी वर्णी
महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणेत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने गुरुवारी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली आणि नियुक्तीचे आदेश जारी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, महावितरण आणि आदिवासी विकास प्रकल्पांमधील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या नव्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्या आहेत.
या फेरबदलात सिंधुदुर्ग आणि यवतमाळ जिल्हा परिषदांसह पालघर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, जळगाव आणि गडचिरोलीतील विविध प्रशासकीय पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. GSDAच्या आयुक्तपदाची जबाबदारी रवींद्र खेबुडकर यांच्याकडे देण्यात आली असून गजेंद्र बावणे यांची महावितरणच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या
१. रविंद्र खेबुडकर
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या रविंद्र खेबुडकर यांची पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA) येथे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. गजेंद्र बावणे
पुणे येथील GSDAचे आयुक्त गजेंद्र बावणे यांची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), छत्रपती संभाजीनगर येथे संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
३. डॉ. अपूर्वा बसूर
पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तसेच जव्हार उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अपूर्वा बसूर यांच्याकडे आता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
४. विशाल खत्री
डहाणू, पालघर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आणि डहाणू उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी असलेल्या विशाल खत्री यांची यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
५. डोनुरु अनन्या रेड्डी
नांदेड येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डोनुरु अनन्या रेड्डी यांची डहाणू, पालघर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तसेच डहाणू उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
६. पी.के. सिद्धार्थ रामकुमार
नाशिक येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी पी.के. सिद्धार्थ रामकुमार यांची जव्हार, पालघर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आणि जव्हार उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
७. कुश मोटवानी
नागपूर येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कुश मोटवानी यांची वर्धा उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
८. आकाश वर्मा
वाशिम येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी आकाश वर्मा यांची चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
९. नंदला साईकिरण
गोंदिया येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी नंदला साईकिरण यांची भंडारा उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
१०. योगेश कुमार मीना
हिंगोली येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुमार मीना यांच्याकडे जळगाव उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
११. शिवांश सिंह
नंदुरबार येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी शिवांश सिंह यांची गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तसेच अहेरी उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रशासकीय फेरबदलामुळे विविध जिल्ह्यांतील जिल्हा परिषद, उपविभागीय प्रशासन आणि आदिवासी विकास प्रकल्पांच्या कामकाजाला नवे नेतृत्व मिळणार आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार संबंधित अधिकारी त्यांच्या नव्या पदांची जबाबदारी स्वीकारणार आहेत.