(Maharashtra HSC Result 2026) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज अधिकृतरीत्या घोषित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे.
पुणे, मुंबईसह अनेक विभागांचा निकाल समाधानकारक लागला असून सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना https://mahahsscboard.in/ या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. (MSBSHSE result)
राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
निकालाची महत्त्वाची आणि ठळक वैशिष्ट्ये
-
राज्याचा एकूण निकाल: ८९.७९%
-
मुलींचा निकाल: ९३.१५%
-
मुलांचा निकाल: ८६.८०%
-
सर्वात जास्त निकाल असलेला विभाग: कोकण
विभागनिहाय निकाल (Maharashtra HSC result 2026 pass percentage details)
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागातून १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
-
पुणे: ९१.२५
-
नागपूर: ८८.६७
-
छत्रपती संभाजीनगर: ८८६८
-
कोल्हापूर: ८९.९७
-
अमरावती: ९०.९२
-
नाशिक: ९०..७२
-
लातूर: ८४.१४
-
कोकण: ९४.१४
-
मुंबई: ९०.०८
कोकण विभागाने यंदाही आपला दबदबा कायम राखत सर्वाधिक निकाल नोंदवला असून मुंबई आणि पुणे विभागांमध्येही चुरशीची कामगिरी दिसून आली आहे.