वर्धा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलीच आघाडीवर; मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.१० टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला.

वर्धा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलीच आघाडीवर; मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.१० टक्के

SSC Result Wardha

परीक्षेत ८२.६६ टक्के मुले उत्तीर्ण; जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८७.२४ टक्के

वर्धा (SSC Result Wardha) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला. वर्धा जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या निकालात मुली आघाडीवर आहेत. दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारावीतही मुलींनी निकालात आघाडी घेतली होती. जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८७.२४ टक्के लागला आहे. दहावीमध्ये ९२.१० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून ८२.६६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याने परीक्षार्थ्यांना उत्सुकता लागलेली होती. दुपारच्या सुमारास दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी इंटरनेटवर निकाल पाहण्यास सुरुवात केली. निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

वर्धा जिल्ह्यात इयत्ता दहावीला १५ हजार २९१ परीक्षार्थी प्रवेशित होते. त्यातील १५ हजार १५१ परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली. जिल्ह्यातील १३,२१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रावीण्य श्रेणीत २,५६८, प्रथम श्रेणीत ४,०८६ तर ४,४७६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत. २,०८८ परीक्षार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झालेत. या निकालाची टक्केवारी ८७.२४ टक्के आहे. नागपूर विभागात वर्धा जिल्हा चौथ्या स्थानावर आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी आहे.

दहावीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि इंटरनेटवर निकाल पाहिला. दहावीची परीक्षा विद्यार्थी जीवनात अतिशय महत्त्वाची ठरते. येथून वेगवेगळ्या शाखांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

यावर्षी जिल्ह्याच्या निकालाच्या टक्केवारीत मागील वर्षाच्या तुलनेत घसरण झाली आहे. मागील वर्षी वर्धा जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८८.८६ टक्के जाहीर झाला होता. यावर्षी ८७.२४ टक्के निकाल लागलेला आहे. यासोबतच नागपूर विभागातील क्रमवारीतही घसरण झाली आहे. मागील वर्षी तिसऱ्या क्रमांकावर असलेला वर्धा जिल्हा यावर्षी चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे अटकेत

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे अटकेत

सोशल मीडियावर एका समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे यांना वर्धा पोलिसांनी अटक केली आहे.

Aug 27, 2026
स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, हिंगणघाट शहरात शोककळा

स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, हिंगणघाट शहरात शोककळा

 एकीकडे सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असतानाच हिंगणघाट शहरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली.

Aug 15, 2026
एफडीएची कारवाई बेकायदेशीर; गोरस भंडाराला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दिलासा

एफडीएची कारवाई बेकायदेशीर; गोरस भंडाराला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दिलासा

अस्वच्छतेच्या कारणावरून ३१ मे रोजी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) यांनी गोरस भंडारावर केलेली बंदीची कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे.

Jul 07, 2026
विदर्भातील शाळा ३० जूननंतरच सुरू होणार

विदर्भातील शाळा ३० जूननंतरच सुरू होणार

विदर्भातील शाळा १५ जून तसेच त्यानंतर २२ जूनपासून सुरू करण्याचे राज्य शासनाचे निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरविले आहेत.

Jun 10, 2026