Maharashtra Anganwadi

अंगणवाडी आणि शालेय पोषण आहारावर FDAची करडी नजर; तुकाराम मुंढेंचे राज्यव्यापी तपासणीचे आदेश

राज्यातील अंगणवाड्या आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवर आता अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

अंगणवाडी आणि शालेय पोषण आहारावर FDAची करडी नजर; तुकाराम मुंढेंचे राज्यव्यापी तपासणीचे आदेश

Maharashtra Anganwadi

निकृष्ट जेवण, खिचडीत आळ्या आणि अस्वच्छतेच्या तक्रारीनंतर पोषण आहार व मिड-डे मिलच्या गुणवत्तेची होणार तपासणी

राज्यातील अंगणवाड्या आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवर आता अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील अंगणवाडी तसेच शालेय आहार व्यवस्थेची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

या तपासणी मोहिमेत अंगणवाडीतील पोषण आहार, शालेय पोषण आहार आणि मिड-डे मिलच्या गुणवत्तेची पडताळणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना आणि बालकांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत अनेक ठिकाणांहून तक्रारी समोर आल्या होत्या.

काही घटनांमध्ये कडधान्यांना भूंगे लागल्याचे, खिचडीत आळ्या आढळल्याचे तसेच आहार तयार करण्याच्या आणि वितरणाच्या ठिकाणी अस्वच्छता असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.

नवीन तपासणी प्रक्रियेमुळे शालेय आणि अंगणवाडी पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा किंवा गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.

संबंधित सामग्री

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPचे शिवाजी पार्कात आंदोलन; तुकाराम मुंढेंना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी, तरुणांचा मोठा सहभाग.

Oct 02, 2026
FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; संजय राऊतांच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर.

Sep 29, 2026
‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

संजय राऊतांनी FDA आयुक्त तुकाराम मुंढेंना पत्र लिहून अधिकाऱ्यांकडून कथित वसुली आणि ‘क्लोजिंग नोटिस’ प्रकरणांची स्वतंत्र चौकशी मागितली.

Sep 28, 2026
मुंबईतील गॅलॉप्स रेस्टॉरंटचा परवाना निलंबित; फ्रीजमधील बर्फावर रक्ताचे डाग, झुरळ-मुंग्यांचा वावर

मुंबईतील गॅलॉप्स रेस्टॉरंटचा परवाना निलंबित; फ्रीजमधील बर्फावर रक्ताचे डाग, झुरळ-मुंग्यांचा वावर

मुंबईतील गॅलॉप्स रेस्टॉरंटचा FDAने परवाना निलंबित केला. तपासणीत बर्फावर रक्ताचे डाग, झुरळे, मुंग्या आणि स्वच्छतेतील त्रुटी आढळल्या.

Sep 23, 2026