हिंगोली (Narhari Zirwal) : राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे उद्या शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी रात्री 8 वाजता नांदेड येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव तसेच मुक्काम राहणार आहे.
शनिवार, दि. 15 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9.05 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती राहील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पुरस्कार वितरण, जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन तसेच आरोग्य वर्धिनी बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11.30 वाजता खेडेकर सुपर स्पेशालिटी ॲन्ड क्रिटीकल केअरच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहणार असून, दुपारी 12 वाजता त्यांची वेळ शासकीय विश्रामगृह येथे राखीव असेल.
त्यानंतर शिरडशहापूर येथे त्यांचे शासकीय वाहनाने दुपारी 1.30 वाजता आगमन होईल व 80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित वीर योद्धा परिवार सम्मान समारोहास उपस्थित राहतील. शिरड शहापूर येथून त्याचे शासकीय वाहनाने वारंगा फाट्याकडे प्रयाण होईल. पालकमंत्री झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे दुपारी 3 वाजता वारंगा फाटा येथे आगमन व कृषी विज्ञान केंद्रास भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता वारंगा फाटा येथून शासकीय वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील.
पालक मंत्री नरहरी झिरवाळ उद्यापासून दोन दिवस हिंगोली दौऱ्यावर
Narhari Zirwal: राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे उद्या शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
Narhari Zirwal
संबंधित सामग्री
स्थानिक गुन्हे शाखेच्या आयत्या पिठावर रेघोट्या: म्हणे बॅटर्या चोरीत दोघांना पकडले
Hingoli District Court Theft:
हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी
Hingoli District and Sessions Court: जिल्ह्यात चोर्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता तर चोरट्यांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी
हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू
Hingoli District Drought: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून या तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू
जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी
Hingoli District Drought: एल निनो'चा इशारा आणि अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाने गाठलेली सरासरी या फेऱ्यात जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस व तूर
तरुणाने व्यसनापासून दूर राहून शिक्षणाकडे लक्ष द्यावे: पालकमंत्री नरहरी झिरवळ
Minister Narhari Zirwal: तालुक्यातील गुंडलवाडी येथे गुरुवारी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत आदिवासी मेळावा उत्साहात पार पडला.