समृद्धी महामार्ग भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू, १८ गंभीर जखमी

Samruddhi Mahamarg Accident: काळाची झडप; दुर्गा मूर्ती घेऊन जात असलेल्या पिकअप वाहनाला भरधाव येणाऱ्या ट्रक ने मागून दिलेल्या भीषण धडकेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २१ जण जखमी..

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू, १८ गंभीर जखमी

Samruddhi Mahamarg Accident

 

दुर्गा मूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; वाहनाला ट्रकची धडक

धामणगाव रेल्वे (Samruddhi Mahamarg Accident) : नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी म्हणून शेगावहून दुर्गा देवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे परतणाऱ्या भाविकांच्या वाहनावर शुक्रवारी पहाटे साडेबारा दरम्यान काळाने झडप घातली. दुर्गा मूर्ती घेऊन जात असलेल्या पिकअप वाहनाला भरधाव येणाऱ्या ट्रक ने मागून दिलेल्या भीषण धडकेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. मंगरूळ दस्तगिर पोलिसांच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर चॅनल क्र.९७ जवळ ही घटना घडली. (Samruddhi Mahamarg Accident) भाविकांचा मृत्यु व सदर थरारक घटनेमुळे वर्धा व  परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

वर्धा येथील रामनगर परिसरातील सोमनाथे ले-आऊट मधील 'नवदुर्गा पूजा उत्सव समिती'चे कार्यकर्ते शेगावहून दुर्गा मातेची मूर्ती घेऊन वाहन  क्र एमएच ०५ बीएच ५७९३ बोलेरो पिकअप ला जोडलेल्या लोखंडी कठड्याच्या ट्रॉलीमधून समृद्धी महामार्गाने वर्ध्याकडे जात होते.दरम्यान रेल्वे समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक ९७ तळणी जवळ एका भरधाव ट्रक क्र. सीजी ०७ सीजे ८८५५ ने त्यांच्या  पिकअप वहानाला मागून जोरदार धडक दिली.

ही (Samruddhi Mahamarg Accident) धडक इतकी भयंकर होती की पिकअपच्या मागे देवी मूर्ती ठेवलेल्या लोखंडी कठडा ट्रॉली सहा बुलेरो पिकअप वाहनाचा चक्काचूर झाला.या जोरदार धडकेत ट्रॉलीवर व वहानात  बसलेल्या २५ भाविकांपैकी अपघातात घनश्याम पाटील वय ६०, प्रवीण बकाने वय ५०, गोलू बालमवार वय ३८, दत्ताजी कुरसंगे वय ५५,ओम गावंडे या ५ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला व  इतर २० जण अत्यंत गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, मदत कक्ष,मंगरूळ दस्तगिर,तळेगाव दशासर, दत्तापुर पोलीस व मदत कक्षाने जखमींना तातडीने शहरातील ग्रामीण रुग्णालय आणले असता सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वर्धा सावंगी येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

पैकी उपचारादरम्यान रोशन गणेश राऊत वय २९ व मुनेश्वर देवराव ढोले वय ५३ या दोघांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ७ झाला आहे.दरम्यान अमित ठाकरे २४ ,सागर ढोले वय ३० ,सतीश खाडे वय ३५,दिनेश पोहनकर,संतोष राऊत वय ४३ सर्व रा.वर्धा व दिनेश नानवटे वय ४४ रा. वडगाव खुर्द या सहा जणांची प्रकृती सुद्धा चिंताजनक असल्याची माहिती आहे.

इतर १२ जणांची प्रकृती गंभीर असून यामध्ये नंदकिशोर शिरस्कार वय ३३, आर्यन वैद्य वय १९,शिवम राऊत वय २६,नयन खानझोंड वय २९, दुर्गेश बिसेन वय३०,अनिल मसराम वय ६०, प्रणय ढोले वय १९ यश मलातपुरे वय १९, शुभम ढबाले वय ३०,प्रतीक शिरस्कर वय २२,प्रवण ढोले वय २९ व नरेंद्र सयाम वय ४९ सर्व रा.वर्धा या १२ जणांवर रुग्णालयात युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत.घटनेत मंगरूळ दस्तगिर,तळेगाव दशासर व दत्तापुर पोलिसांकडून मदत करण्यात आली.सध्या दत्तापूर पोलीस, मंगरूळ दस्तगीर पोलीस आणि वाहतूक पोलीस शाखेचे पथक या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत.

धडक दिल्यानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाला अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. सणासुदीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण वर्धा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे..सण उत्सवाच्या निमित्ताने घडलेल्या या दुर्दैवी  घटनेने संपूर्ण विदर्भात हळहळ व्यक्त होत आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील,पोलीस अधीक्षक निकेतन कदम,अपर पोलीस अधिक्षक दत्ता तोटेवार,उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश ताथोड  यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि मदतकार्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे,तहसीलदार अभय घोरपडे  व धामणगावच्या नगराध्यक्षा अर्चना रोठे (अडसड) यांनी सुद्धा रुग्णालय गाठून जखमींना पुढील उपचारासाठी सर्वोपरी मदत केली.

लोखंडी कठड्यावर बांधून दुर्गा मूर्ती घेऊन जाणाऱ्या पीक वहानाला समृद्धी महामार्ग वरून जाण्याची परवानगी दिली कुणी ?

समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg Accident) हा अति धृतगती महामार्ग आहे.या महामार्गावर वाहनांची कार्यक्षमता तपासून पुढे जाणे क्रमप्राप्त आहे.शिवाय दुचाकी,बैलगाडी,ट्रॅक्टर व इतर तत्सम वहांनांना या मार्गावर प्रवेश नाही.तरी सुद्धा लोखंडी कटड्यावर पिकअप वहानाला ट्रॉलीकरून दुर्गा मूर्ती ठेवून  टोल नाक्यावर या वहानाला प्रवेश कसा मिळाला ?.असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित सामग्री

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषद; धान खरेदी, नुकसानभरपाई, महामार्ग व रोजगाराच्या मागण्या.

Sep 18, 2026
समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा; मुंबई लेनवर वाहतुकीचा मोठा खोळंबा, वाहनांच्या लांबच लांब रांगा

समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा; मुंबई लेनवर वाहतुकीचा मोठा खोळंबा, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Samruddhi Mahamarg Traffic Jam: नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणारा एचआर ५५ बीए ८५४४ क्रमांकाचा ट्रक गणेशपूर शिवारातील चॅनेज क्रमांक ६१ जवळ चालकाने चक्क रस्त्याच्या मध्यभागी आडवा लावला.

Aug 09, 2026
समृद्धी महामार्गावरील लुटीचा पर्दाफाश; चिखली तालुक्यातील पाच आरोपी जेरबंद

समृद्धी महामार्गावरील लुटीचा पर्दाफाश; चिखली तालुक्यातील पाच आरोपी जेरबंद

Samruddhi Mahamarg Robbery: समृद्धी महामार्गावर प्रवाशांना तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवून लुटणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा कारंजा शहर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश

Aug 02, 2026
समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना; पत्नीची कारमध्ये हत्या करून तीन मुलांसह पतीने गाठले पोलीस ठाणे

समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना; पत्नीची कारमध्ये हत्या करून तीन मुलांसह पतीने गाठले पोलीस ठाणे

वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Jul 14, 2026
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलरला फॉर्च्यूनरची जोरदार धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलरला फॉर्च्यूनरची जोरदार धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून भरधाव फॉर्च्यूनर कारने समोर धावणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

Jun 23, 2026