पंपावर रांगा, प्रशासन म्हणते ऑल इज वेल !

 नागपूरमध्ये सध्या एक विचित्र नाट्य सुरू आहे. प्रशासनाचे ठरलेले वाक्य, ऑल इज वेल तर वास्तविकतेत पेट्रोल-डिझेल मुबलक आहे.

पंपावर रांगा, प्रशासन म्हणते ऑल इज वेल !

Ground Reality

फेरफटका

(Ground Reality) नागपूरमध्ये सध्या एक विचित्र नाट्य सुरू आहे. प्रशासनाचे ठरलेले वाक्य, ऑल इज वेल तर वास्तविकतेत पेट्रोल-डिझेल मुबलक आहे. दुसऱ्या बाजूला वास्तव म्हणजे तासन्तास रांगा, रिकामे पंप आणि त्रस्त नागरिक. प्रश्न सरळ आहे जर सर्व काही वेल असेल, तर नागपूरकरांना पेट्रोलसाठी रांगेत का उभे राहावे लागतेय? गेल्या ४८ तासांपासून शहर अक्षरशः थांबले आहे. पेट्रोल पंपांवरील रांगा आता नागपूरच्या रस्त्यांचे नवे चित्र बनले आहे. कामावर जाणारा नोकरदार उशिरा पोहोचतोय, विद्यार्थ्यांची शाळा-ट्युशन चुकतेय, रुग्णालयाकडे जाणारे रुग्ण अडकलेत आणि प्रशासन अजूनही घाबरू नका म्हणतेय. तासन्तास थांबल्यानंतर नो स्टॉकचा बोर्ड पाहून परत फिरणाऱ्या नागरिकांच्या सहनशक्तीची थट्टाचालली आहे का? अघोषित रेशनिंग ही तर या व्यवस्थेची उघडी पडलेली बाजू आहे. दुचाकीसाठी २-३ लिटर, चारचाकीसाठी १० लिटर हा कोणता मुबलक पुरवठा ? जर खरोखर इंधन उपलब्ध असेल, तर ही मर्यादा का? आणि टंचाई असेल, तर ती मान्य करण्याची प्रामाणिकता प्रशासनात का नाही? प्रशासनाचे विधान आणि जमिनीवरील परिस्थिती यामधील दरी इतकी मोठी कधीच नव्हती.

नागरिक विचारतात रांगा दिसत नाहीत का? की त्या फक्त आमच्याच वाट्याला? भीतीमुळे साठेबाजी होते, हे सांगणे सोपे आहे; पण ती भीती निर्माण होण्यामागे प्रशासनाचा गोंधळ, अस्पष्ट माहिती आणि समन्वयाचा अभाव नाही का? अन्न व नागरी पुरवठा विभाग कुठे आहे? पंपांवर एकसमान नियम का नाहीत? काही ठिकाणी कॅनमध्ये पेट्रोल विक्रीचे प्रकार सुरू असून हा उघड नियमभंग नाही का? की हेही ऑल इज वेलमध्येच येते? दरम्यान, शहराचा वेग मंदावला आहे. डिलिव्हरी बॉय, ऑटोचालक, छोटे व्यावसायिक सर्वांची रोजीरोटी धोक्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूकही कोलमडण्याच्या मार्गावर आहे. तरीही प्रशासनाचा एकच सूर सर्व काही नियंत्रणात आहे. खरेच? की फक्त शब्दांचे आभासी आवरण?

नागपूरकरांना आश्वासनांची नव्हे, तर कृतीची गरज आहे. टँकर्स वाढवा, पंपांवर शिस्त लावा, पारदर्शक माहिती द्या, इतके साधे उपायही का होत नाहीत? अन्यथा 'ऑल इज वेल' ही घोषणा नागपूरकरांसाठी एक कटू विनोद ठरेल आणि प्रशासनासाठी अपयशाची उघडी कबुली राहणार…!

सामाजिक 
सेजल पुनसे 

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026