शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

२.४५ हेक्टर जागेच्या प्रश्नी लोकप्रतिनिधींची बैठक घ्या! 

Government Medical College: विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, लातूर यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आलेल्या २.४५ हेक्टर जागेचा वापर अद्यापही विविध प्रशासकीय

२.४५ हेक्टर जागेच्या प्रश्नी लोकप्रतिनिधींची बैठक घ्या! 

Government Medical College


वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आ. अभिमन्यू पवार यांची मागणी

लातूर (Government Medical College) : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, लातूर यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आलेल्या २.४५ हेक्टर जागेचा वापर अद्यापही विविध प्रशासकीय व कायदेशीर कारणांमुळे प्रलंबित आहे. या महत्त्वपूर्ण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लातूर जिल्ह्यातील खासदार-आमदार, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्य शासनाच्या संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आ. पवार यांनी मंत्री मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांना सविस्तर निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, लातूर येथील जुने रेल्वे स्थानक ते हरंगुळ स्थानक दरम्यानची सुमारे ३२ हेक्टर ८१ आर जागा महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २९ मार्च २००७ रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. या बदल्यात रेल्वे विभागाला पुण्यातील लोहगाव व हडपसर येथील जागा तसेच ४५ निवासी घरे उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले होते.त्यानुसार शासनाने आवश्यक कार्यवाही करून रेल्वे विभागासाठी ४५ निवासस्थाने उभारून त्यांचा ताबाही रेल्वे प्रशासनाला दिला. तसेच लातूर येथील २.४५ हेक्टर जागा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) व सर्वोपचार रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्यात आली. संबंधित जागेचा ताबा जिल्हा प्रशासनामार्फत वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे देण्यात आला असून अभिलेखांमध्येही आवश्यक नोंदी करण्यात आल्या आहेत.

मात्र, संपूर्ण ३२ हेक्टर ८१ आर जागेच्या मोबदल्याबाबत काही बाबी प्रलंबित असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात रेल्वे विभागाने न्यायालयात दिवाणी दावा दाखल केल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावर जागा हस्तांतरित होऊनही तिचा प्रत्यक्ष वापर करता येत नाही. परिणामी रुग्णालय विस्तार, सुपरस्पेशालिटी इमारतींची उभारणी, वैद्यकीय शिक्षण सुविधांचा विकास आणि रुग्णसेवा वाढविण्याच्या योजना रखडल्या आहेत. जागेचा प्रश्न निकाली निघाल्यास (Government Medical College) रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होऊन लातूरसह संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार व आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकतील.

लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विधी व न्याय विभाग, महसूल विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी लातूर, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता तसेच लातूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांची संयुक्त आढावा बैठक तातडीने आयोजित करण्यात यावी, अशी मागणी आ. पवार यांनी केली आहे.

संबंधित सामग्री

लातूरमध्ये शिक्षण संस्था चालकाची गोळी झाडून आत्महत्या; शिक्षण क्षेत्रात खळबळ

लातूरमध्ये शिक्षण संस्था चालकाची गोळी झाडून आत्महत्या; शिक्षण क्षेत्रात खळबळ

लातूरमधील डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Sep 15, 2026
शेतकरी पुत्राची आभाळाला झेप; चार पिढ्यांनंतर नळगीर तांड्यात पहिला डॉक्टर!

शेतकरी पुत्राची आभाळाला झेप; चार पिढ्यांनंतर नळगीर तांड्यात पहिला डॉक्टर!

रोहित दिलीप पवार नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे.

Sep 05, 2026
हिंगोली शासकीय रुग्णालयात गुंतागुंतीची जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी

हिंगोली शासकीय रुग्णालयात गुंतागुंतीची जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी

शासकीय जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली येथे रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाच्या जबड्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.

Sep 03, 2026
हिंगोलीत राज्यस्तरीय बालरोगतज्ज्ञ परिषदेचे यशस्वी आयोजन

हिंगोलीत राज्यस्तरीय बालरोगतज्ज्ञ परिषदेचे यशस्वी आयोजन

बालकांमधील गंभीर आजार तसेच आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीच्या व्यवस्थापनाबाबत महाराष्ट्रातील नामवंत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

Jun 20, 2026
हिंगोलीच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील एमआरआय सेंटर चालकास जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

हिंगोलीच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील एमआरआय सेंटर चालकास जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

Hingoli Medical College: हिंगोलीत एमआरआय सेंटरमध्ये रुग्णांची आर्थिक लुट होत असल्याच्या आरोपावर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कार्यालयात बैठक करून चालकाला फटकारले.

May 29, 2026