Inspirational Story

शेतकरी पुत्राची आभाळाला झेप; चार पिढ्यांनंतर नळगीर तांड्यात पहिला डॉक्टर!

रोहित दिलीप पवार नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे.

शेतकरी पुत्राची आभाळाला झेप; चार पिढ्यांनंतर नळगीर तांड्यात पहिला डॉक्टर!

उदगीर : जिद्द असेल तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, यशाला गवसणी घालता येते, हे उदगीर तालुक्यातील नळगीर तांड्यातील शेतकरी पुत्र रोहित दिलीप पवार याने आपल्या यशातून सिद्ध केले आहे. शेतीच्या मातीत वाढलेल्या रोहितने नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात तब्बल ५१५ गुणांची दमदार कामगिरी करत रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे, चार पिढ्यांनंतर नळगीर तांड्यातून पहिला एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान रोहितला मिळणार आहे. त्यामुळे त्याच्या यशाने संपूर्ण तांड्याचा उर अभिमानाने भरून आला आहे.

रोहितचे वडील दिलीप पवार हे शेतकरी आहेत. शेती व्यवसाय करत असतानाही त्यांनी मुलाच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. परिस्थितीची कोणतीही सबब न सांगता रोहितने अभ्यासात सातत्य ठेवले. मेहनत, जिद्द, आत्मविश्वास आणि ध्येयावरची अढळ निष्ठा या जोरावर त्याने नीटसारख्या कठीण परीक्षेत यश मिळवले.

कुटुंबाच्या त्यागाला मिळाले यशाचे फळ!

रोहितच्या यशामागे वडील दिलीप पवार यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचे मोठे योगदान आहे. किरण पवार, पूजा पवार आणि प्रांजली पवार यांनीही त्याला अभ्यासाच्या काळात सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. कुटुंबाच्या या पाठबळामुळे रोहितने वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले.

रोहितच्या यशाची वार्ता समजताच नळगीर तांड्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

एका शेतकरी कुटुंबाच्या स्वप्नाला मिळालेली ही भरारी आता संपूर्ण नळगीर तांड्याची प्रेरणा ठरली आहे. ‘शेतकऱ्याच्या घरातूनही डॉक्टर घडतो’ हा आत्मविश्वास रोहितने आपल्या कर्तृत्वातून जागवला आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
“ई-कार्डचा बिघाड अन् वृद्धांवर संतापाचा उद्रेक; एसटी वाहकाच्या शिवीगाळीचा आरोप!”

“ई-कार्डचा बिघाड अन् वृद्धांवर संतापाचा उद्रेक; एसटी वाहकाच्या शिवीगाळीचा आरोप!”

Udgir ST E-Card: ई-कार्ड मशीन बंद असल्याच्या कारणावरून उदगीर-अहमदपूर एसटी बसमध्ये प्रवासी आणि वाहकात झालेला वाद चांगलाच पेटल्याचा आरोप आहे. या वादात वाहकाने प्रवाशांना तसेच त्यांच्या आई-बहिणींविषयी

Oct 05, 2026
उदगीरच्या दूध डेअरीला ‘हिरवा कंदील’; दुसऱ्या धवलक्रांतीचा मार्ग मोकळा!

उदगीरच्या दूध डेअरीला ‘हिरवा कंदील’; दुसऱ्या धवलक्रांतीचा मार्ग मोकळा!

Udgir's milk dairy: वर्षानुवर्षे बंद असलेल्या उदगीरच्या शासकीय दूध डेअरीच्या पुनरुज्जीवनाला अखेर महत्त्वाचे वळण मिळाले आहे. उदगीर येथील शासकीय दूध डेअरीच्या अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल

Oct 05, 2026
अवैध सावकारीच्या संशयावरून उदगीरमध्ये छापा; कोरे बाँड, कोरे चेकसह हिशोबाच्या वह्या जप्त

अवैध सावकारीच्या संशयावरून उदगीरमध्ये छापा; कोरे बाँड, कोरे चेकसह हिशोबाच्या वह्या जप्त

Udgir Illegal Money Lending: उदगीर तालुक्यातील कथित विनापरवाना अवैध सावकारी व्यवहाराच्या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाने सोमवारी (५ ऑक्टोबर) मोठी कारवाई केली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४

Oct 05, 2026