गणपती मंदिरात 'ड्रेस कोड

गणपती मंदिरात 'ड्रेस कोड' लागू; गुडघ्यापेक्षा वरच्या तोकड्या कपड्यांवर प्रवेश बंदी

Ganpati Temple Dress Code: महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील श्रीदेव गणपती मंदिरात 1 जानेवारी 2027 पासून भाविकांसाठी वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) सक्तीची

गणपती मंदिरात 'ड्रेस कोड' लागू; गुडघ्यापेक्षा वरच्या तोकड्या कपड्यांवर प्रवेश बंदी

Ganpati Temple Dress Code

रत्नागिरी (Ganpati Temple Dress Code) : महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील (Ganpati Temple Dress Code) श्रीदेव गणपती मंदिरात 1 जानेवारी 2027 पासून भाविकांसाठी वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) सक्तीची करण्यात येणार आहे. मंदिराचे पावित्र्य, धार्मिक परंपरा आणि शिस्त कायम राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर देवस्थान प्रशासनाने दिली.

‘संस्थान श्रीदेव गणपतीपुळे’ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नीलेश कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात गेल्या वर्षीपासूनच वस्त्रसंहितेची प्राथमिक स्वरूपात अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. मात्र, नियमांची माहिती नसल्यामुळे भाविकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जनजागृतीवर भर देण्यात आला.

आता 1 जानेवारी 2027 पासून वस्त्रसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. (Ganpati Temple Dress Code) मंदिरात गुडघ्यापेक्षा वर असलेल्या तोकड्या कपड्यांवर बंदी राहणार आहे. भाविकांनी मंदिराच्या धार्मिक वातावरणाला साजेशी वस्त्रे परिधान करून दर्शनासाठी यावे, असे आवाहन देवस्थान प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वस्त्रसंहितेची सुरुवातीला अंमलबजावणी करण्यात आली तेव्हा काही भाविकांनी नियमांची माहिती नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने आधी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विविध माध्यमांतून वस्त्रसंहितेबाबत भाविकांना माहिती देण्यात आली.

गणपतीपुळे मंदिरात (Ganpati Temple Dress Code) दरवर्षी सुमारे 25 लाख भाविक दर्शनासाठी येतात. दररोज सरासरी एक हजार भाविक मंदिरात दर्शन घेतात. तर संकष्टी आणि विनायकी चतुर्थीच्या दिवशी भाविकांची संख्या साधारण पाचपट वाढते. दरम्यान, भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानच्या वतीने अन्नछत्र तसेच निवासाची पुरेशी व्यवस्था उपलब्ध असल्याचे ट्रस्टने सांगितले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026