मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहिम

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक: CM देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राला मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व समाजघटकांचे सहयोगाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक: CM देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis

मुंबई (CM Devendra Fadnavis) : मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र साध्य करणे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज केले.

 नेत्रआरोग्य क्षेत्रात मोलाचे कार्य करत समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल तसेच शंकरा आय फाउंडेशन इंडिया या संस्था रुग्णसेवेसाठी सातत्याने कार्यरत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टरांचा कार्यसंघ आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून या संस्थांनी हजारो रुग्णांना दृष्टीदान करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणला आहे.  'मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र' या मोहिमेत ही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, शंकरा आय हॉस्पिटल व शंकरा आय फाउंडेशन इंडिया यांचे कार्य हे सार्वजनिक - खाजगी भागीदारी, सामाजिक संवेदनशीलता आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा यांचे आदर्श उदाहरण आहे. शंकरा आय फाउंडेशन इंडिया ही संस्था देशभरात नेत्रसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवांची उपक्रमे राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल येथील आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल हे अत्याधुनिक सुविधा, उच्च दर्जाची उपचारपद्धती आणि रुग्णकेंद्रित सेवा यासाठी ओळखले जाते.

या रुग्णालयामध्ये मोतीबिंदू, रेटिना, ग्लॉकोमा, कॉर्निया, बाल नेत्ररोग तसेच इतर नेत्रविकारांवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठीही सवलतीच्या दरात किंवा मोफत उपचाराची सुविधा देण्यात येते. ग्रामीण आणि दुर्गम भागात नेत्रतपासणी शिबीरे आयोजित करून गरजू रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्याचे कार्यही संस्था सातत्याने करत आहे. अशा उपक्रमांमुळे ‘ मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळ मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, जून २०२१ ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत हॉस्पिटलच्या माध्यमातून कोंकण, मुंबई , मराठवाडा, खानदेश या भागात १,४२८ मोफत नेत्रतपासणी शिबीरे आयोजित करण्यात आली व २,३८,६०४ रुग्णांची तपासणी आणि ४३,४३५ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. यापैकी सुमारे ८० टक्के रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया देण्यात आल्या, ही बाब सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरणारी आहे.

याशिवाय, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना (एमजेपीजेएवाया) अंतर्गत ७५३ गंभीर नेत्ररोगग्रस्त रुग्णांना (रेटिना, कॉर्निया, बाल स्क्विंट व बाल मोतीबिंदू) लाभ देण्यात आला. तसेच, शालेय मुलांच्या नेत्रआरोग्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘रेनबो – आय हेल्थ प्रोजेक्ट’ अंतर्गत रायगड, नवी मुंबई व एमएमआरडीए परिसरातील २२८ शाळांमधील १,३८,६०३ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये ३,६५० चष्म्यांचे मोफत वितरण आणि २९ बाल नेत्रशस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात आल्या. या उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलच्या अध्यक्षा रेखा झुनझुनवाला, आणि शंकरा आय फाउंडेशन इंडियाचे संस्थापक व विश्वस्त डॉ. आर. व्ही. रमणी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026