विद्याधर महाले 

देवा भाऊ मुख्यमंत्रीपदी असल्यानेच तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी निर्भीडपणे काम करू शकतात: विद्याधर महाले 

Vidyadhar Mahale:

देवा भाऊ मुख्यमंत्रीपदी असल्यानेच तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी निर्भीडपणे काम करू शकतात: विद्याधर महाले 

Vidyadhar Mahale

बुलढाणा (Vidyadhar Mahale) : “मुख्यमंत्रीपदी राज्याचे देवाभाऊ असल्यामुळेच तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी आज निर्भीडपणे आणि कोणत्याही दबावाशिवाय काम करू शकत आहेत,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव तथा मंत्रालयातील सहसचिव दर्जाचे वरिष्ठ अधिकारी . विद्याधरजी महाले यांनी केले. महाराष्ट्राच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वासोबतच अधिकाऱ्यांना पारदर्शक आणि निर्भीडपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात हे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधरजी महाले (Vidyadhar Mahale) यांच्या ५०व्या वर्षातील पदार्पणानिमित्त बुलढाणा शहरात आयोजित भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला सत्कारमूर्ती विद्याधरजी महाले , पदवीधर विधान परिषद सदस्य आमदार धीरज लिंगाडे, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धृपतरावजी सावळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर बिडवे यांनी केले.

या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने चिखली व बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक कार्डिओलॉजिकल ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. तसेच विद्याधर महाले साहेब मित्रमंडळाच्या वतीने सहकार विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यामुळे वाढदिवसाचा हा सोहळा सत्कारापुरता मर्यादित न राहता आरोग्यसेवा आणि शिक्षणाला हातभार लावणाऱ्या सामाजिक उपक्रमांचा केंद्रबिंदू ठरला.

‘विद्याधर महाले यांच्या कर्तृत्वाचा लाभ बुलढाण्याला होणार’

कार्यक्रमातील भाषणांचा प्रारंभ माजी आमदार धृपतरावजी सावळे यांनी केला. त्यांनी विद्याधर महाले यांच्या जीवनप्रवासाचा आणि कर्तृत्वाचा आढावा घेत त्यांच्या प्रशासकीय कार्याचा गौरव केला. प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय, शिस्त आणि कार्यक्षमता यांची सांगड घालत त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे सावळे यांनी नमूद केले.
“विद्याधर महाले यांच्यासारखी व्यक्ती राज्याच्या प्रशासनातील महत्त्वाच्या ठिकाणी कार्यरत असणे ही बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या अनुभवाचा, संपर्काचा आणि कार्यक्षमतेचा उपयोग जिल्ह्यातील विकासकामांना निश्चितच होऊ शकतो. बुलढाण्याच्या प्रश्नांची जाण असलेला आणि प्रशासनाच्या सर्वोच्च स्तरावर काम करणारा अधिकारी जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावू शकतो,” अशा आशयाचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय इच्छाशक्तीसोबत प्रशासकीय समन्वयाची आवश्यकता असल्याचे सांगत विद्याधर महाले यांच्या कर्तृत्वामुळे जिल्ह्याला भविष्यात विविध क्षेत्रांत फायदा होण्याची अपेक्षा आमदार धीरज लिंगाडे यांनी व्यक्त केली. आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी आपल्या भाषणातून सामाजिक उपक्रमांसोबतच बुलढाण्यातील राजकीय परिस्थितीवर थेट भाष्य केले. “बुलढाण्याच्या सेवेचे व्रत आम्ही आजपासून स्वीकारत आहोत आणि त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही,” असे सांगत त्यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘राजकारणात येऊ नका; पुढच्या वर्षी IAS व्हा!’

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी आपल्या भाषणात विद्याधर महाले यांना मात्र आगळावेगळा आणि प्रेमळ सल्ला दिला. “तुम्ही राजकारणात येऊच नका. राजकारण खूपच घाण आहे,” असे सांगत त्यांनी मिश्कील शैलीत, “पुढच्या वर्षी तुम्ही IAS व्हा; म्हणजे यापेक्षा दहापट मोठा सत्कार मी स्वतः घडवून आणतो,” असे उद्गार काढले.

त्याचवेळी आमदार श्वेताताई महाले यांनाही त्यांनी अधिक विधायक आणि विकासाभिमुख कामांकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. “उगाच कचऱ्याच्या नादी लागू नका,” असा प्रेमळ टोला लगावत त्यांनी राजकीय वादांपेक्षा विकासकामांना अधिक महत्त्व देण्याचे आवाहन केले.

राधेश्याम चांडक यांनी आपल्या भाषणात देशाचा कारभार प्रत्यक्षात राजकीय व्यक्तींपेक्षा नोकरशहांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर चालतो, अशा आशयाची मिश्कील टिप्पणी केली. त्याला उत्तर देताना विद्याधर महाले यांनी प्रशासन आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.

“अधिकाऱ्यांना पारदर्शकपणे आणि निर्भीडपणे काम करण्याचे स्वातंत्र्य नेतृत्वाकडून मिळाले, तर प्रशासन अधिक प्रभावीपणे काम करू शकते,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना विश्वासाने काम करण्याचे वातावरण दिल्यामुळे प्रशासनातील अधिकारी अनेक कठीण निर्णयही निर्भीडपणे घेऊ शकत असल्याचे त्यांनी नमूद केले. तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी आज निर्भयपणे काम करत असल्याचे उदाहरण देत त्यांनी यामागे सक्षम राजकीय नेतृत्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.

‘विदर्भाचा सुपुत्र मुख्यमंत्रीपदी असल्याचा फायदा विदर्भाला’

आपल्या भाषणात विद्याधर महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या विकासाला मिळालेल्या गतीचाही उल्लेख केला. “विदर्भाचा सुपुत्र मुख्यमंत्रीपदी बसला आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी गती मिळत आहे,” असे ते म्हणाले.

राज्य सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत त्यांनी शेतकरी, महिला, युवक आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले. विकासाच्या प्रक्रियेत प्रशासन, राजकीय नेतृत्व आणि समाज यांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बुलढाण्याच्या विकासासाठी राजकीय वातावरण सकारात्मक असावे, प्रशासनाला निर्भीडपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळावे आणि सामाजिक बांधिलकीतून आरोग्य व शिक्षणाला बळ मिळावे, असा एकत्रित संदेश या अभिष्टचिंतन सोहळ्यातून पुढे आला.

संबंधित सामग्री

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रहिवासी तालुक्यातील बँकांमधूनच पीक कर्ज द्या: आ. श्वेताताई महाले

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रहिवासी तालुक्यातील बँकांमधूनच पीक कर्ज द्या: आ. श्वेताताई महाले

MLA Shwetatai Mahale: तालुक्यातील बँकांमार्फतच त्याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली....

Oct 06, 2026
दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचा शासन निर्णय काढणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचा शासन निर्णय काढणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

CM Devendra Fadnavis:  दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचा शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार अशी माहिती मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Sep 24, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; सरसकट मदतीचा निर्णय: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; सरसकट मदतीचा निर्णय: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

CM Devendra Fadnavis: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतला असून,येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sep 23, 2026
पिकांचे सरसकट नुकसान, मदतही सरसकट; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

पिकांचे सरसकट नुकसान, मदतही सरसकट; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

CM Devendra Fadnavis: संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे न सोडता शासन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली..

Sep 23, 2026
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis: शासनाने दुष्काळाची परिस्थिती अतिशय गांभीर्याने घेतली आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

Sep 23, 2026