मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis: शासनाने दुष्काळाची परिस्थिती अतिशय गांभीर्याने घेतली आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis

 

दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच

लातूर (CM Devendra Fadnavis) : शासनाने दुष्काळाची परिस्थिती अतिशय गांभीर्याने घेतली आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. लातूर, धाराशीव जिल्ह्यातील पीक-पाणी परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे आज (ता.23) सकाळी लातूर विमानतळावर आगमन झाले, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

दुष्काळाच्या संबंधाने करावयाच्या आवश्यक त्या उपयोजनांबाबत शासनस्तरावर योग्य कार्यवाही सुरू आहे. तसेच दुष्काळासंदर्भातील अहवाल शासनास प्राप्त झालेले आहेत. सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत शासन करत आहे.  सोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभही देण्यात येत आहे. यासाठी आवश्यक तेवढा ‍निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

दुष्काळी परिस्थितीत आवश्यक असणारे पाणी, जनावरांचा चारा आदी बाबींचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याचेही (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचा शासन निर्णय काढणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचा शासन निर्णय काढणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

CM Devendra Fadnavis:  दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचा शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार अशी माहिती मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Sep 24, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; सरसकट मदतीचा निर्णय: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; सरसकट मदतीचा निर्णय: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

CM Devendra Fadnavis: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतला असून,येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sep 23, 2026
पिकांचे सरसकट नुकसान, मदतही सरसकट; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

पिकांचे सरसकट नुकसान, मदतही सरसकट; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

CM Devendra Fadnavis: संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे न सोडता शासन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली..

Sep 23, 2026
पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis: पत्रकारांचे काम हे अनियमित वेळेचे आणि सतत धावपळीचे असते. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी व उपचार शिबीर महत्त्वपूर्ण ठरेल

Sep 04, 2026