चिखली समाधान शिबिर

चिखलीत ३ ऑगस्टला भव्य 'समाधान शिबिर'; आमदार श्वेता महाले पाटील यांचे नागरिकांना आवाहन

Chikhali Samadhan Shibir: शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी 'छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर

चिखलीत ३ ऑगस्टला भव्य 'समाधान शिबिर'; आमदार श्वेता महाले पाटील यांचे नागरिकांना आवाहन

Chikhali Samadhan Shibir

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त

चिखली () : राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी चिखली मंडळातील मौनी बाबा संस्थान येथे चिखली तहसील कार्यालयामार्फत 'छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिराचे' भव्य आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना अधिक प्रभावी करत नागरिकांना प्रशासनातील सेवा सुलभ, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावा, (Chikhali Samadhan Shibir) प्रत्येक नागरिकाचा प्रश्न स्थानिक पातळीवरच मार्गी लागावा आणि विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन असून त्याच संकल्पनेतून अशा समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार (Ajit Pawar)  यांच्या कार्याचा उल्लेख करत सांगितले की, प्रशासनातील गतिमान निर्णयप्रक्रिया, विकासकामांना दिलेले प्राधान्य आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी कायम सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले हे समाधान शिबिर म्हणजे विकासाच्या त्या विचारांना अभिवादन असून शासनाच्या सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रभावी उपक्रम आहे.

आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या की, नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, विविध दाखले, प्रमाणपत्रे, महसूल विषयक सेवा, कृषी, आरोग्य, ग्रामविकास, पुरवठा, सामाजिक न्याय तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, यासाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून लोकाभिमुख व परिणामकारक प्रशासन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या (Chikhali Samadhan Shibir) विशेष शिबिरामध्ये महिलांना शेतकरी दर्जा देण्यासंदर्भातील पत्रांचे वाटप, गावठाणातील स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, जिवंत सातबारा मोहीम, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनांचे लाभ, पीएम किसान लँड सीडिंग, डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ उतारे, आधार नोंदणी व अद्ययावतीकरण, विविध दाखले व प्रमाणपत्रे, मतदान ओळखपत्र सेवा, विशेष सहाय योजना, संजय गांधी निराधार योजना, नवीन रेशनकार्ड व ई-केवायसी, जॉबकार्ड, आभा कार्ड, प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा फुले जनआरोग्य योजना, आरोग्य तपासणी, महाडीबीटी पोर्टलवरील कृषी योजनांचे लाभ, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामविकास विभागाच्या विविध योजना तसेच जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणीसह अनेक शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पात्र नागरिकाने आवश्यक कागदपत्रांसह या (Chikhali Samadhan Shibir) शिबिरात उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार श्वेता महाले पाटील यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेला आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीला साजेशा या उपक्रमातून हजारो नागरिकांना थेट लाभ मिळेल, असा विश्वासही (MLA Shweta Mahale Patil) त्यांनी व्यक्त केला.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026