तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांना दणका

Tukaram Mundhe: ‘विमल पान मसाला’ची 'सरोगेट' (अप्रत्यक्ष) जाहिरात केल्याप्रकरणी सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र एफडीएने 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे.

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांना दणका

Tukaram Mundhe

शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला एफडीएची 'कारणे दाखवा' नोटीस

मुंबई (Tukaram Mundhe) : आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी आता आपला मोर्चा थेट बॉलिवूडच्या बड्या स्टार्सकडे वळवला आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’ची 'सरोगेट' (अप्रत्यक्ष) जाहिरात केल्याप्रकरणी सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan), अजय देवगण आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांना महाराष्ट्र एफडीएने 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अजय देवगण (Ajay Devgn), शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हे तीनही अभिनेते 'विमल इलायची'च्या जाहिरातीत एकत्र झळकले होते. 'विमल इलायची'च्या नावाखाली प्रत्यक्षात 'विमल पान मसाला' या तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटख्याची अप्रत्यक्ष जाहिरात केली जात असल्याचा ठपका एफडीएने ठेवला आहे. महाराष्ट्रात 13 जुलै 2026च्या सुधारित आदेशानुसार तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी आहे.

या तिन्ही कलाकारांना एफडीएने कठोर शब्दांत नोटीस पाठवली असून पुढील निर्देश दिले आहेत:
1. जाहिरात तत्काळ थांबवा: ‘विमल पान मसाला/इलायची’च्या जाहिरातीतील तुमचा सहभाग तात्काळ थांबवा.
2. प्रमोशनल मजकूर हटवा: तुमच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया हँडल आणि वेबसाइटवरून या जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल मजकूर काढून टाका.
3. 15 दिवसांत स्पष्टीकरण द्या: या प्रकरणी तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये? तसेच या जाहिरातीतील तुमच्या भूमिकेबाबत सविस्तर लेखी स्पष्टीकरण १५ दिवसांच्या आत सादर करा.

ही नोटीस अजय देवगणला त्याच्या जुहू येथील घरी, शाहरुख खानला वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्यावर आणि टायगर श्रॉफला (Tiger Shroff) त्याच्या 'टायगर श्रॉफ प्रॉडक्शन्स एलएलपी' या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून पाठवण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPचे शिवाजी पार्कात आंदोलन; तुकाराम मुंढेंना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी, तरुणांचा मोठा सहभाग.

Oct 02, 2026
FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; संजय राऊतांच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर.

Sep 29, 2026
‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

संजय राऊतांनी FDA आयुक्त तुकाराम मुंढेंना पत्र लिहून अधिकाऱ्यांकडून कथित वसुली आणि ‘क्लोजिंग नोटिस’ प्रकरणांची स्वतंत्र चौकशी मागितली.

Sep 28, 2026
मुंबईतील गॅलॉप्स रेस्टॉरंटचा परवाना निलंबित; फ्रीजमधील बर्फावर रक्ताचे डाग, झुरळ-मुंग्यांचा वावर

मुंबईतील गॅलॉप्स रेस्टॉरंटचा परवाना निलंबित; फ्रीजमधील बर्फावर रक्ताचे डाग, झुरळ-मुंग्यांचा वावर

मुंबईतील गॅलॉप्स रेस्टॉरंटचा FDAने परवाना निलंबित केला. तपासणीत बर्फावर रक्ताचे डाग, झुरळे, मुंग्या आणि स्वच्छतेतील त्रुटी आढळल्या.

Sep 23, 2026