राज्य अन्न आयोग

'भीक नका देऊ, त्यांना स्वावलंबी बनवा!'

State Food Commission: रस्त्यावर, सिग्नलवार, मंदिरा बाहेर तसेच सार्वजनिक ठिकाणी भिक्षावृत्तीला प्रोत्साहन देऊ नका, असे आवाहन करताना त्या ऐवजी त्यांना पैशाऐवजी गरज असेल तर अन्न द्या

'भीक नका देऊ, त्यांना स्वावलंबी बनवा!'

State Food Commission

 

राज्य अन्न आयोगाचे जनजागरण; संबंधितांना दिल्या सूचना 

लातूर (State Food Commission) : रस्त्यावर, सिग्नलवार, मंदिरा बाहेर तसेच सार्वजनिक ठिकाणी भिक्षावृत्तीला प्रोत्साहन देऊ नका, असे आवाहन करताना त्या ऐवजी त्यांना पैशाऐवजी गरज असेल तर अन्न द्या, पण कायमस्वरूपी उपायासाठी जवळच्या सेवाभावी संस्थेकडे, शासकीय कार्यालयांकडे पाठवा व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करा, असे आवाहन राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष एडवोकेट महेश ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. याबाबत राज्य अन्न आयोगाने महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांना पत्र देत सर्व शासकीय कार्यालयात मार्फत राज्यात याबाबत जनजागृती करण्याची सूचना केली आहे. 

याबाबत केलेल्या आवाहनात (State Food Commission) राज्य अन्न आयोगाने म्हटले आहे की, आपल्या शहरात निदर्शनास येणारी भिक्षावृत्ती व त्यास मानवतेच्या दृष्टीने आपण देत असलेला प्रतिसाद ही खरी समाजसेवा नाही, तर ती एका मोठ्या टोळी आणि मानवी तस्करीला खतपाणी घालणारी बाब आहे. आपण दिलेली १०-२० रुपयांची भीक त्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही. केंद्र शासन व राज्य शासन सार्वजनिक वितरण व्यवस्था, शालेय पोषण आहार योजना तसेच राष्ट्रीय एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांमधुन वय वर्षे ० ते ३, ३ ते ६, गरोदर माता, स्तनदामाता, अपंग, वृध्द, दुर्धर आजारग्रस्त, तृतीय पंथी, भटके इत्यादी समाज घटकांना सहाय्य करीत आहे, त्याकरीता शासनाच्या विविध यंत्रणा कार्यरत असून राज्य अन्न आयोगाने सदर कार्यात पुढाकार घेतलेला आहे. अनेकवेळा लहान मुलांना मुद्दाम अपंग बनवून, व्यसनाधीन करून भीक मागायला लावली जाते. म्हणून सर्व सुजाण नागरिकांनी भिक्षेकर्‍यांना पैशाऐवजी गरज असेल तर अन्न द्या, पण कायमस्वरूपी उपायासाठी जवळच्या सेवाभावी संस्थेकडे, शासकीय कार्यालयांकडे पाठवा. बालकांना भीक मागताना पाहिल्यास १०९८ (चाइल्ड लाईन) वर किंवा १०० वर संपर्क साधा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विशेष म्हणजे या कार्यामध्ये नागरिकांच्या सूचना व काही निरक्षणे असल्यास (State Food Commission) राज्य अन्न आयोगाच्या ई-मेल rajyaannaayog@gmail.com वर पाठवण्यात याव्यात, असे आवाहन राज्य अन्न आयोगाने केले आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधींकडून ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच; देशभरातील जनतेच्या तक्रारी आणि आंदोलनांची माहिती आता एकाच नकाशावर

राहुल गांधींकडून ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच; देशभरातील जनतेच्या तक्रारी आणि आंदोलनांची माहिती आता एकाच नकाशावर

राहुल गांधी यांनी ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच केले. नागरिकांना तक्रारी व आंदोलनांची माहिती नोंदवता येणार असून, विविध संघर्ष डिजिटल नकाशावर जोडले जाणार आहेत.

Oct 03, 2026
हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव प्रशासनानेच साजरा करावा

हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव प्रशासनानेच साजरा करावा

Hingoli Dussehra Festival: देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व प्रसिद्ध मानला जाणारा हिंगोलीचा ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ प्रशासनामार्फतच साजरा करावा

Aug 31, 2026
दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रोखला अडीच तास महामार्ग!

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रोखला अडीच तास महामार्ग!

Marathwada Farmers' Protest: पावसाची अनिश्चितता, शेतीमालाला अपेक्षित भावाचा अभाव, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा अखेर महामार्गावर उद्रेक

Aug 23, 2026
शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शिंगी येथे शक्तिपीठ महामार्गाची मोजणी स्थगित

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शिंगी येथे शक्तिपीठ महामार्गाची मोजणी स्थगित

Shaktipeth Highway Protest: तालुक्यातील शिंगी व परिसरात शक्तिपीठ महामार्गासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोजणीला परिसरातील शेतकऱ्यांनी एकजुटीने ठाम विरोध केला. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Aug 21, 2026
परभणीत मनपाच्या आंदोलकांनी केल्या घंटागाड्या बंद

परभणीत मनपाच्या आंदोलकांनी केल्या घंटागाड्या बंद

Parbhani Garbage Vehicle: थकीत वेतन, सेवानिवृत्ती वेतन तसेच जीएसटी अनुदानाच्या फरकाची रक्कम द्यावी, या मागणीसाठी सोमवार १० ऑगस्ट पासून महापालिका कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

Aug 21, 2026