परभणी घंटागाड्या बंद

परभणीत मनपाच्या आंदोलकांनी केल्या घंटागाड्या बंद

Parbhani Garbage Vehicle: थकीत वेतन, सेवानिवृत्ती वेतन तसेच जीएसटी अनुदानाच्या फरकाची रक्कम द्यावी, या मागणीसाठी सोमवार १० ऑगस्ट पासून महापालिका कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

परभणीत मनपाच्या आंदोलकांनी केल्या घंटागाड्या बंद

Parbhani Garbage Vehicle

चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचे एक वेतन,सेवानिवृत्तांचे एक वेतन केले जमा

परभणी (Parbhani Garbage Vehicle) :  थकीत वेतन, सेवानिवृत्ती वेतन तसेच जीएसटी अनुदानाच्या फरकाची रक्कम द्यावी, या मागणीसाठी सोमवार १० ऑगस्ट पासून महापालिका कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी आंदोलकांनी कचरा संकलनाच्या घंटागाड्या बंद केल्या. दरम्यान चतुर्थी श्रेणी कर्मचार्‍यांचे एक महिन्याचे आणि सेवानिवृत्तांची एक पेन्शन जमा करण्यात आली आहे.

शहर महापालिकेला जीएसटी अनुदान फरकाची ७२ कोटींची रक्कम द्यावी, कर्मचार्‍यांचे थकीत वेतन, सेवानिवृत्ती वेतन अदा करावे, या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. भिकमांगो, मुंडण, पिंडदान, तसेच मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मनपा कर्मचार्‍यांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी आंदोलनकांनी कचरा संकलन करणार्‍या घंटागाड्या बंद केल्या. कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. कामबंद आंदोलनामुळे महापालिकेतील कामकाज ठप्प पडले आहे.

संबंधित सामग्री

परभणीतील मनपा आंदोलक आक्रमक; मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे

परभणीतील मनपा आंदोलक आक्रमक; मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे

Parbhani Municipal Protest: थकीत वेतन आणि जीएसटी अनुदान फरकाची रक्कम मिळावी, यासाठी सोमवार १० ऑगस्ट पासून महापालिकेतील कर्मचारी कामबंद आंदोलनावर आहेत. शासनाचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

Aug 17, 2026
महापौर सय्यद इकबाल यांच्यावर हल्याचा प्रयत्न; निषेर्धात अधिकारी, कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन 

महापौर सय्यद इकबाल यांच्यावर हल्याचा प्रयत्न; निषेर्धात अधिकारी, कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन 

Mayor Syed Iqbal: महानगरपालिकेतील महापौर सय्यद इकबाल यांचा दालनात गुरुवारला गुन्हा करून आरोपी अटक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना धाकटा भासण्यासाठी काम बंद आंदोलन

Jul 10, 2026
प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष; आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर

प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष; आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर

RTO Indefinite Strike: मोटार वाहन विभाग करमचार्य संघटनाने राजस्थानातील सर्व आरटीओ कार्यालयांमधील करमचारींच्या बेमुदत संपावरावर पुन्हा आंदोलन केले आहे.

Jun 16, 2026
तपोवन देवी ते आंत्रिखेडेकर रस्त्याची दयनीय अवस्था

तपोवन देवी ते आंत्रिखेडेकर रस्त्याची दयनीय अवस्था

Chikhli Farmers Andolan: रोहडा-आंत्रिखेडेकर रस्त्याची खराब अवस्था आणि गेल्या पाच महिन्यापासून अपरिपक्व रस्ता तपोवन देवी ते आंत्रिखेडेकर रस्त्यावर कामाची मागणी

May 24, 2026
चार महिन्यांच्या थकीत हमाली देयकांसाठी कामगारांचे काम बंद आंदोलन

चार महिन्यांच्या थकीत हमाली देयकांसाठी कामगारांचे काम बंद आंदोलन

Hamal Labor Andolan: कळमनुरी येथील हमाल कामगारांनी जानेवारी ते एप्रिल २०२६ पर्यंतच्या थकीत देयकांची मागणी करून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

May 20, 2026