आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते भीमजयंतीनिमित्त अभिवादन; चिखलीत उत्साहपूर्ण वातावरण

“राष्ट्र कोहिनूर भीमरायांना सहर्ष देऊ मानवंदना” या घोषवाक्याने चिखली शहरात भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते भीमजयंतीनिमित्त अभिवादन; चिखलीत उत्साहपूर्ण वातावरण

Ambedkar Jayanti

चिखली (Ambedkar Jayanti) : “राष्ट्र कोहिनूर भीमरायांना सहर्ष देऊ मानवंदना” या घोषवाक्याने चिखली शहरात भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सम्राट अशोक, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, चिखली यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी विजयस्तंभ चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना आमदार  श्वेताताई महाले पाटील यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. “शिक्षण, समता आणि बंधुता या तत्वांवर चालत समाजाची उन्नती साधणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे,” असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आ श्वेताताई महाले पाटील,नगराध्यक्ष सर्वश्री पंडितदादा देशमुख, उपाध्यक्ष सौ. वैशालीताई खेडेकर, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, गटनेते अमोल खबूतरे, आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे, शिक्षण सभापती रफीकसेठ, पाणीपुरवठा सभापती दत्ता सुसर, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. सुनंदाताई शिनगारे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ. नीताताई सोळंकी, नगरसेविका सौ. अश्विनी जाधव, शहर सरचिटणीस युवराज भुसारी, श्याम वाकदकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विजय खरे, राहुल सवडतकर, बांधकाम सभापती सुहास शेटे, नगरसेवक मोहित व्यवहारे, दीपक खरात, प्रशांत भटकर, सुजित भराड, सौ. उषाताई पवार, भारत पवार, शैलेश देशमुख, विकी शिनगारे, भाई छोटू कांबळे, बाळू भिसे, अमोल सुरडकर, नारायण जाधव, सुमीत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान भीमगीतांचा गजर, घोषणांनी दुमदुमलेले वातावरण आणि सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे भीमजयंती उत्सवाला विशेष रंगत आली. शेवटी सर्वांना शुभेच्छा देत समाजात समता, बंधुता आणि एकात्मता दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026