प्राथ. आरोग्य केंद्राचे बांधकाम बंद

कोपर्ली प्राथ. आरोग्य केंद्राचे बांधकाम बंद करण्याचे आदेश

नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुरु असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम बंद करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास देण्यात आले आहेत.

कोपर्ली प्राथ. आरोग्य केंद्राचे बांधकाम बंद करण्याचे आदेश

Primary Health Center

नंदुरबार (Primary Health Center) : तालुक्यातील कोपर्ली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुरु असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम बंद करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास देण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सुनावणी घेण्यात आली होती.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पायाभुत सुब्धिा विकास कक्ष नंदुरचार मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) व निवासस्थाने बांधकाम कोपली येथे गट नं. ७६ खळवाड या जागेत सुरु असुन त्या संदर्भात सुभाष नेरकर/चौधरी याचे तकार अर्ज व ग्रामपंचायत कोपर्ली यांनी सदर जागेसंदर्भात देण्यात आलेल्या खुलासा या करिता एकत्रित बैठक (सुनवाणी) वि. २८/०१/२०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात घेण्यात आली होती.

सदर ग्रामपंचायत कोपर्ली येथील खळवाड गट क्र.७६ मधील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम झालेल्या सुनावणी चर्चानुसार अंतिम निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी चर्चेत सदर खंडपिंगत दि. २५ जुलै २०१८ दावा पासुन दाखल असून अद्याप त्याबाबत कोणतेही निकाल दिलेले नसुन सदर न्यायालया मार्फत सदर बांधकामबाबत कोणतेही स्थगिती आदेश निर्गमित केले नसल्याने मंजुर असलेले प्राथनिक आरोग्य केंद्र बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे.

परंतु सद्यस्थितीत बांधकाम सुरु असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची (Primary Health Center) इमारत बांधकामासारी जिल्हाधिकारी, नंदुरबार यांचे कडून आवश्यक असलेली रितसर परवानगी घेऊन तदनंतरच काम सुरु करावे.

संबंधित सामग्री

रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगत प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्ण केला रेफर 

रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगत प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्ण केला रेफर 

Primary Health Center Ambulance: महिलांना रुग्णवाहिकेच्या दाखलास नकार दिल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्ण रेफर करण्याच्या प्रवृत्तीमुळे आरोग्य कर्मचारी एकच शिपाई नेमवण्याची मागणी होत आहे.

May 26, 2026