हिंगोली (Farmer ID Registration) : राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी विशेष फार्मर आयडी नोंदणी मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे.
वनहक्क अधिनियम, 2006 अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वनजमिनीवरील हक्क प्रदान करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने वनपट्टा धारक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी फार्मर आयडी नोंदणीस प्राधान्य देण्यात येत आहे. ही नोंदणी प्रक्रिया राज्यातील नागरी सुविधा केंद्रामार्फत करण्यात येत असून, शेतकऱ्यांनी आपल्या जवळील नागरी सुविधा केंद्रात आवश्यक कागदपत्रांसह भेट देऊन नोंदणी करून घ्यावी. विशेष म्हणजे, या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
फार्मर आयडी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजना, अनुदान, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती सहाय्य तसेच इतर डिजिटल कृषी सेवांचा लाभ सुलभपणे मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे शासनाच्या सेवांचा पारदर्शक व वेगवान लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास सहाय्य होणार आहे.
राज्यातील सर्व वनपट्टा धारक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी तात्काळ करून घ्यावी, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी मोहीम सुरू
Farmer ID Registration: राज्यातील वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी मोहीम सुरू झाली असून, यामुळे विविध कृषी योजनांचा लाभ सुलभपणे मिळणे शक्य होईल.
Farmer ID Registration
संबंधित सामग्री
सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...
India Smoking Deaths: सिगारेट ओढणारी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याला धोका निर्माण करतेच; मात्र तिच्या आसपास असलेल्या धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली
Viatina-19 Cow Record: ब्राझीलमध्ये झालेल्या एका विशेष लिलावात भारतीय वंशाच्या नेल्लोर (ओंगोल) प्रजातीतील ‘वियाटिना-19’ या गायीने तब्बल 40 कोटी रुपयांची विक्रमी बोली, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर
Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती
‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि धर्मांतराविरोधात कठोर कायदा येणार?
West Bengal UCC: पश्चिम बंगालच्या राजकारणात समान नागरी कायदा म्हणजेच UCC लागू करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये लवकरच UCC लागू
‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण
सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.