रिसोड बाजार समिती

रिसोड बाजार समितीचा मोठा निर्णय; हळद ओट्याला आता दोन्ही बाजूंनी मिळाले पत्रा छावणीचे संरक्षण

Risod Bazar Samiti: रिसोड बाजार समितीने हळद ओट्याला दोन्ही बाजूंनी छपऱ्या ठोकून पावसातील नुकसान टाळण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षाच्या मागणीला यश.

रिसोड बाजार समितीचा मोठा निर्णय; हळद ओट्याला आता दोन्ही बाजूंनी मिळाले पत्रा छावणीचे संरक्षण

Risod Bazar Samiti

 

शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण; पावसाळ्यात भिजणाऱ्या हळदीच्या पिकाला मिळणार सुरक्षा

रिसोड (Risod Bazar Samiti) : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीतील हळद खरेदी-विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या ओट्याला दोन्ही बाजूंनी पत्रा छावणी (शेड) ठोकण्याचे काम पूर्ण झाले असून, यामुळे आता पावसाळ्यात होणारे हळदीचे नुकसान टळणार आहे. 'भूमिपुत्र' संघटना आणि शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

पावसामुळे होत होती मोठी नासाडी

रिसोड बाजार समितीमध्ये (Risod Bazar Samiti) हळदीची आवक मोठी असते. मात्र, बाजार समितीतील हळदीच्या ओट्यावरील मूळ टीन शेड अत्यंत उंच होते. परिणामी, पावसाळ्यात वारा आणि पावसाच्या तिरप्या सरींमुळे संपूर्ण ओट्यावर पाणी साचत असे. ओट्यावर विक्रीसाठी ठेवलेला हळदीचा माल यामुळे ओला होऊन खराब व्हायचा. शेतकऱ्यांच्या मेहनतीचा माल डोळ्यादेखत भिजत असल्याने, या ओट्याला दोन्ही बाजूंनी संरक्षक छपऱ्या लावण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती.

संचालक मंडळाचा गतिमान निर्णय

​हळदीची वाढती आवक आणि नैसर्गिक हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन, (Risod Bazar Samiti) बाजार समितीच्या संचालक मंडळाने या विषयावर गांभीर्याने चर्चा केली. शेतकरी हिताला प्राधान्य देत, ओट्याच्या दोन्ही बाजूंनी छपऱ्या ठोकण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयामुळे आता कितीही पाऊस झाला तरी ओट्यावरील हळद सुरक्षित राहणार आहे. नूतन कामाची पाहणी करण्यासाठी आज बाजार समितीचे सभापती तथा 'भूमिपुत्र'चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत माजी सभापती शामराव पाटील उगले, बाजार समितीचे मार्गदर्शक भास्कररावजी मोरे, अंबादासजी खरात आणि संचालक  बुधनेर उपस्थित होते. ​यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून मान्यवरांनी कामाच्या दर्जाची खातरजमा केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले, तर मान्यवरांनी पूर्ण झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026