परभणी शेत आग

परभणीत शेतातील आखाड्याला भीषण आग; दीड लाखांचे नुकसान

Parbhani farm fire: परभणीतील जिंतूर तालुक्यात सावरगाव तांडा येथे महिला शेतकरी संगीता राठोड यांच्या शेतातील आखाड्याला आग लागली. त्यात तीन स्प्रिंकलर सेट जळून खाक झाले व दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.

परभणीत शेतातील आखाड्याला भीषण आग; दीड लाखांचे नुकसान

Parbhani farm fire

 

महिला शेतकरी संगीता राठोड यांचे तीन स्प्रिंकलर सेट जळून खाक

परभणी (Parbhani farm fire) : जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथील गट क्रमांक १२७ मधील महिला शेतकरी संगीता संजय राठोड यांच्या शेतातील आखाड्याला सोमवार ११ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत तीन स्प्रिंकलर सेट पूर्णपणे जळून खाक झाले असून आंबा व नारळाची काही झाडेदेखील आगीत भस्मसात झाली आहेत. या (Parbhani farm fire) घटनेत जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार ११ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने शेतातील साहित्य व झाडांचे मोठे नुकसान झाले. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या (Parbhani farm fire) घटनेमुळे महिला शेतकरी संगीता राठोड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. शासनाने पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संगीता राठोड यांनी केली आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

Illegal firecracker stockpile: हिंगोली शहरातील कपडा गल्ली येथे फटाक्याच्या गोदामाला आग लागून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पोलीस स्टेशनकडून जाहीर सूचना जारी करण्यात आली आहे.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026