वसमत (Mondha Turmeric Theft) : वसमत येथील मोंढा परिसरात असलेला गोदामावरील पत्रे काढून चोरट्यांनी दोन व्यापाऱ्यांचे हळदीचे 47 कट्टे चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमुळे मोंढा परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे मोंढा परिसरात वारंवार हळद चोरीच्या व शेतमाल चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापारी वर्गात चिंचेचे वातावरण आहे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
हळदीला चांगला भाव मिळणार असल्याच्या आशेने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी हळद जपून ठेवली आहे. अनेकांनी गोदामात हळद साठवून ठेवली आहे मात्र चोरट्यांनी गोदामावरच डल्ला मारून हळदीची पोते चोरून नेल्याची घटना समोर आल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. मोंढा परिसरातील बालाजी जिनिंग परिसरात असलेल्या गोदामाचे वरील पत्रे काढून चोरट्याने हळदीचे 47 कट्टे चोरून नेल्याची घटना घडली आहे. दोन-तीन व्यापाऱ्यांच्या गोदामात चोरट्यांनी चोरी केली असल्याचे समोर येत आहे. यामध्ये शुभम ट्रेडिंग कंपनी यांची 28 कट्टे, तर देवेश भराडिया यांचे 19 कट्टे व इतर व्यापाऱ्यांचे सुद्धा कट्टे चोरीस गेल्याचे समोर येत आहे. चोरट्याने एकूण साडेतीन ते चार लाख रुपयांची हळद चोरून नेली आहे
गोदामातील हळदीचा साठा (Mondha Turmeric Theft) मोजमाप झाल्यानंतर नेमकी हळद किती चोरीला गेली हे समोर येऊ शकते त्यामुळे चोरीचा आकडा वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. गोदाम एका बाजूला असल्याने फारसे कोणाचे लक्ष गेले नाही त्याचा लाभ चोरट्याने उचलला चोरट्याने गोदामावरील पत्र काढून हळदीवर डल्ला मारला आहे. यापूर्वीही अनेकदा व्यापाऱ्यांच्या गोदामातील हळद चोरीच्या घटना घडलेली आहेत चोरटे शिरजोर झाल्यामुळे चोरांना लगाम लागत नाही. व्यापारी शेतकरी त्रस्त आहेत मार्केट यार्ड परिसरात वाढलेल्या चोऱ्यांमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. ही चोरी एकाच वेळेस झाली का टप्प्या टप्प्यात झाली हे समजण्यास मार्ग नाही मात्र अनेकदा गोदामातील हळद मोजणी करताना कमी असल्याचे आढळते तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात येते.
गोदामातील हळद चोरून नेल्याच्या घटनेनंतर संबंधित व्यापाऱ्यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी पंचनामा करून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत पोलीस ठाण्याचे कर्मचारी तपास करत आहेत.
हळदीचे दोन गोदाम फोडले; हळदीचे 47 कट्टे चोरट्याने केले लंपास
Mondha Turmeric Theft: वसमत येथील मोंढा परिसरात असलेला गोदामावरील पत्रे काढून चोरट्यांनी दोन व्यापाऱ्यांचे हळदीचे 47 कट्टे चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. चोरीमुळे मोंढा परिसरातील व्यापाऱ्यांमध
Mondha Turmeric Theft
संबंधित सामग्री
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू
ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम
आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज
मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.
केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर
लोहगडच्या दरीत नेऊन केतनचा मृत्यू; आरोपींनी घटनास्थळासह लोणावळ्यातील दरीतील मृत्यूंची माहिती शोधल्याचा पोलिसांचा दावा
भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
भद्रावतीत भर चौकात ४० वर्षीय उमदेव मेश्राम यांची धारदार शस्त्राने हत्या. अज्ञात आरोपींचा शोध सुरू; पोलिसांकडून तपासाला वेग.