Bhadravati Murder

भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

भद्रावतीत भर चौकात ४० वर्षीय उमदेव मेश्राम यांची धारदार शस्त्राने हत्या. अज्ञात आरोपींचा शोध सुरू; पोलिसांकडून तपासाला वेग.

भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

Bhadravati Murder

भद्रावती (चंद्रपूर) : शहरातील गजबजलेल्या भद्रनाग मंदिर चौकात आज, दि. २३ सप्टेंबर २०२६, बुधवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास, एका ४० वर्षीय युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने मानेवर वार करून निर्घृण हत्या केली. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले आहेत.

मृतकाची ओळख उमदेव भाऊराव मेश्राम (वय ४०, रा. देऊरवाडा, हल्ली मु. शिवाजीनगर, प्रज्ञा वाचनालयाजवळ, भद्रावती) अशी झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, उमदेव मेश्राम हे बुधवारी सकाळी सुमारे ७.३० वाजता घरून मोटारसायकलने कामानिमित्त निघाले होते. ते भद्रनाग मंदिर चौकात पोहोचताच दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्राने मानेवर गंभीर वार झाल्याने ते कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

सकाळच्या वर्दळीच्या वेळीच ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

हल्लेखोर कोण होते? या हत्येमागील नेमके कारण काय? याचा कसून तपास पोलिसांकडून सुरू असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या थरारक हत्याकांडामुळे भद्रावती शहरात तणावाचे वातावरण असून पुढील पोलीस तपासाकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026