शेतकरी कर्जमुक्ती योजना

कर्जमुक्ती योजनेत घोळ, बँक खात्यातील आणि यादीतील रक्कमेत मोठी तफावत!   

Farm Loan Waiver Scheme: ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या यादीतील कर्ज रक्कम आणि बँक खात्यात जमा होणाऱ्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत

कर्जमुक्ती योजनेत घोळ, बँक खात्यातील आणि यादीतील रक्कमेत मोठी तफावत!   

Farm Loan Waiver Scheme

 

कृषिमंत्र्यांना निवेदन 
मानोरा (Farm Loan Waiver Scheme) :
 राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या यादीतील कर्ज रक्कम आणि बँक खात्यात जमा होणाऱ्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.  

शिवसेनेचे तालुका तालुका प्रमुख रविंद्र पवार आणि तालुका संघटक बाळू  राठोड यांनी उपविभागीय अधिकारी, कारंजा लाड यांच्यामार्फत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने २ लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु आधार प्रमाणीकरण करताना अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात यादीतील रकमेपेक्षा कमी रक्कम जमा होत असल्याचे समोर आले आहे.  

तालुक्यातील अनेक शेतकरी यामुळे संभ्रमावस्थेत असून त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. हा बँकांचा घोळ आहे की निष्काळजीपणा, याची चौकशी करून संबंधित बँक व्यवस्थापनावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी या प्रकरणाची सखोल पडताळणी करून तफावत त्वरित दूर करावी. अन्यथा या गंभीर प्रकरणात शासनाने संबंधित बँकेवर कोणतीही कारवाई केली नाही, तर शेतकऱ्यांमध्ये शासन आणि बँक प्रशासनाबाबत संशय निर्माण होईल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मानोरा तालुक्याच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही पवार आणि राठोड यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. 

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026