हिंगणघाट बाजार समिती

हिंगणघाट बाजार समितीचा अनोखा उपक्रम; ४६ अंश तापमानात शेतकऱ्यांना कैरी पाण्याचा दिलासा

Hinganghat Bazar Samiti: हिंगणघाट बाजार समितीने शेतकऱ्यांना तापमान ४६ अंश सेल्सियसच्या उष्णतेत कैरी पाण्याचे निशुल्क वाटप सुरू केले आहे. दररोज २००० लोकांना थंडपानी दिली

हिंगणघाट बाजार समितीचा अनोखा उपक्रम; ४६ अंश तापमानात शेतकऱ्यांना कैरी पाण्याचा दिलासा

Hinganghat Bazar Samiti

हिंगणघाट (Hinganghat Bazar Samiti) : वाढत्या उष्णतेमुळे तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गही तीव्र उन्हाच्या झळा सहन करत आहे. अशा परिस्थितीत हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आणि बाजार परिसरातील कामगारांसाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. (Hinganghat Bazar Samiti) बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये गेल्या दोन दिवसांपासून निशुल्क आंबा कैरी पाण्याचे वाटप करण्यात येत आहे.

सध्या बाजार समितीत (Hinganghat Bazar Samiti) धान्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असून, खरिप हंगामाच्या पूर्वतयारीमुळे शेतकऱ्यांची बाजारात वर्दळ वाढली आहे. रखरखत्या उन्हामुळे शेतकरी, हमाल, व्यापारी, अडते आणि मापारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने बाजार समिती प्रशासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत दररोज सुमारे दोन हजार नागरिकांना आणि शेतकऱ्यांना थंडगार कैरी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. उन्हाच्या तीव्रतेत हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत असून, अनेकांनी याचे स्वागत केले आहे. कैरी पाणी पिल्यानंतर जणू काही अमृत मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

बाजार समितीचे (Hinganghat Bazar Samiti) कर्मचारी आणि युवा अडते शिस्तबद्ध पद्धतीने कैरी पाण्याचे वाटप करत आहेत. या उपक्रमामुळे बाजार समितीची शेतकरी हिताची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे. या उपक्रमासाठी बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी पुढाकार घेतला असून, पुढील एक महिन्यापर्यंत हा निशुल्क उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वीही एक रुपयात जेवण यांसारखे शेतकरीहिताचे उपक्रम राबवणाऱ्या हिंगणघाट बाजार समितीने शेतकऱ्यांच्या आरोग्याची आणि सुविधांची काळजी घेत असल्याचे या उपक्रमातून पुन्हा एकदा दिसून आले आहे.

संबंधित सामग्री

कोट्यवधींचा दांडिया खर्च शेतकऱ्यांसाठी द्या; मराठी एकीकरण समितीची मागणी

कोट्यवधींचा दांडिया खर्च शेतकऱ्यांसाठी द्या; मराठी एकीकरण समितीची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गरबा-दांडियाच्या कोट्यवधींच्या खर्चावरून वाद. मराठी एकीकरण समितीने निधी शेतकऱ्यांसाठी वापरण्याची मागणी केली.

Sep 30, 2026
दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांनाही मदतीचा मार्ग मोकळा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांनाही मदतीचा मार्ग मोकळा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांसाठी अन्य निकषांवर मदतीचा प्रस्ताव; पाणीवापर आणि दहावी-बारावी परीक्षा शुल्काबाबतही फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश.

Sep 29, 2026

‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे आणि संपूर्ण अहवालानंतर मदत देण्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.

Sep 28, 2026
दुष्काळाचा केवळ जीआर, प्रत्यक्ष मदत कधी? सुधाकर देशमुखांचा सरकारवर हल्लाबोल

दुष्काळाचा केवळ जीआर, प्रत्यक्ष मदत कधी? सुधाकर देशमुखांचा सरकारवर हल्लाबोल

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार? सुधाकर देशमुखांचा सरकारला सवाल.

Sep 27, 2026