हिंगोली बाजार समिती

हिंगोली कृउबासमध्ये हळदीचे दर वाढल्याने आवक वाढली; आणखी २०० वाहने उभीच

Hingoli Bazar Samiti: हिंगोलीतील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ७ एप्रिल रोजी हळदीला प्रति क्विंटल १४ हजार ते १५५०० रुपये दर मिळाला.

हिंगोली कृउबासमध्ये हळदीचे दर वाढल्याने आवक वाढली; आणखी २०० वाहने उभीच

Hingoli Bazar Samiti

प्रति क्विंटल १४ हजार ते १५५०० रुपये दर, हळदीला आणखी दर वाढीची प्रतिक्षा

हिंगोली (Hingoli Bazar Samiti) : कृषि उत्पन्न बाजार समितीमधील शेती माल खरेदी विक्रीचे व्यवहार सोमवार पासुन पुर्ववत सुरू झाले आहेत. मोंढा सुरू होताच हळदीचे दर वाढल्याने आता हळदीची आवक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मंगळवारी ३ हजार क्विंटल हळदीचा लिलाव झाला. आणखी २०० वाहनात हळद तशीच शिल्लक होती.

हिंगोली येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये (Hingoli Bazar Samiti) हळदीला चांगले दर मिळत असल्याने जिल्ह्यास परजिल्हा व विदर्भातून मोठ्या प्रमाणात अनेक शेतकरी हळद विक्रीस आणत असतात. मध्यंतरी मार्च एन्ड व नाने टंचाईमुळे ४ एप्रिलपर्यंत हिंगोली कृउबासमध्ये शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. ६ एप्रिलपासुन बाजार समितीमधील शेती माल खरेदी विक्रीचे व्यवहार पुर्ववत सुरू झाले.

विशेष म्हणजे संत नामदेव हळद मार्केटमध्ये (Hingoli Bazar Samiti) हळद विक्रीसाठी वाहनांची रांगच रांग लागत आहे. बाजार समितीच्या यार्डासह रस्त्यावर अनेक शेतकरी वाहनातून हळद विक्रीस आणत आहेत. ७ एप्रिल मंगळवार रोजी ३ हजार क्विंटल हळदीचा लिलाव झाला. हळदीला १४ हजार ते १५५०० रुपये असा दर मिळाला. हळदीचे दर वाढल्याने आवक वाढतच चालली आहे. आणखी २०० वाहनामध्ये हळद लिलावासाठी प्रतिक्षेत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026