हडोळती पवार शेतकरी

​अखेर सहकार मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला! 

Hadolti Pawar Farmer: बैलबारदाण्याचा खर्च परवडत नसल्याने खांद्यावर जोखड घेऊन शेतीची आंतरमशागत करणाऱ्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार व मुक्ताबाई पवार या दांपत्याने निर्णय..

​अखेर सहकार मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला! 

Hadolti Pawar Farmer

 

५६ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे हडोळतीच्या पवार दांपत्याकडून स्वागत!

​बलभीम पवार
अहमदपूर (Hadolti Pawar Farmer) :
बैलबारदाण्याचा खर्च परवडत नसल्याने खांद्यावर जोखड घेऊन शेतीची आंतरमशागत करणाऱ्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार व मुक्ताबाई पवार या दांपत्याने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. बाबासाहेब पाटील यांनी दिलेला शब्द पाळला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

गेल्या वर्षी बैल-बारदानण्याचा खर्च परवडत नसल्याने स्वतःलाच कोळपणीला जुंपून पवार दाम्पत्याने पिकांच्या आंतरमशागतीची कामे केली होती. ज्याची गंभीर दखल घेत दैनिक ‘देशोन्नती’ने उठवलेल्या आवाजामुळे हे प्रकरण विधानसभेत प्रचंड गाजले होते आणि संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.

या (Hadolti Pawar Farmer) घटनेची तात्काळ दखल घेऊन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी संबंधित शेतकऱ्याचे वैयक्तिक कर्ज भरून मदतीचा हात दिला होता, मात्र त्यावेळी पवार दांपत्याने "साहेब, माझं एकट्याचे कर्ज फेडून चालणार नाही, तर राज्यातील सर्वच शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून त्यांना कर्जमुक्तीचा आधार द्यावा," अशी आग्रही मागणी केली होती.

यावर महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथराव शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून सर्वसमावेशक कर्जमाफीचा निर्णय घेऊ, असा शब्द सहकार मंत्र्यांनी दिला होता. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेला शब्द पाळत राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना नुकतीच कर्जमाफी जाहीर केली असून, त्याची प्रत्यक्ष यादी आज विविध बँकांमध्ये धडकल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे आणि अंबादास पवार दांपत्याने शासनाचे व सहकार मंत्र्यांच्या निर्णयाचे याबद्दल स्वागत केले आहे. 

केवळ कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा प्रश्न पूर्णपणे सुटणार नसल्याने आगामी काळात शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आधारित शेतीमालाला योग्य भाव देण्यासाठी शासनाने व सहकार मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी रास्त मागणी आता (Hadolti Pawar Farmer) शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.

पावसाअभावी शेतकरी संकटात!

सध्या लातूर जिल्ह्यासह अहमदपूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पावसाच्या अभावाने पिके कोमेजत आहेत, तर काही ठिकाणी अद्याप पेरण्याही झाल्या नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने विविध स्तरांवरून उपाययोजना आखून बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026