​सोयाबीन बोगस बियाणे

​सोयाबीन बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची उघड लूट; बोगस बियाण्यांमुळे चिखली तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात!

Spurious soybean seeds: सोयाबीनचे बियाणे शेतात न उगवल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या प्रकरणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने थेट बांधावर जात आक्रमक भूमिका घेतली आहे.

​सोयाबीन बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची उघड लूट; बोगस बियाण्यांमुळे चिखली तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात!

Spurious soybean seeds

 

​क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून कंपन्यांना व कृषी विभागाला इशारा

​चिखली (Spurious soybean seeds) : यावर्षी आधीच मान्सूनचा पहिला पाऊस अत्यंत उशिरा आल्यामुळे चिखली तालुक्यातील पेरण्या कमालीच्या लांबल्या आहेत. अशातच आता बियाणे कंपन्यांच्या मनमानी आणि फसव्या कारभारामुळे तालुक्यातील शेतकरी राजा मोठ्या दुहेरी संकटात सापडला आहे. चिखली तालुक्यातील खंडाळा म. येथील शेतकरी रत्नाकर पुरुषोत्तम सिताफळे यांनी विकत घेतलेले सोयाबीनचे बियाणे शेतात न उगवल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या प्रकरणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने थेट बांधावर जात आक्रमक भूमिका घेतली आहे.

​४ हजारांचे सोयाबीन १५ हजारात पदरी; कंपन्यांचा नफेखोर धंदा
सध्या बियाणे बाजारात कंपन्यांची मोठी मनमानी सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक बियाणे कंपन्या खुल्या बाजारातून अवघ्या ४,००० ते ५,००० रुपये प्रति क्विंटल या कमी भावाने सोयाबीनची खरेदी करतात. त्यावर केवळ जुजबी प्रक्रिया करून हेच सोयाबीन बियाणे म्हणून शेतकऱ्यांना तब्बल १५० रुपये प्रति किलो (म्हणजेच १५,००० रुपये प्रति क्विंटल) या चढ्या दराने विकले जात आहे. या अवाजवी नफेखोरीमुळे भोळ्याभाबड्या शेतकरी वर्गाची उघड फसवणूक आणि आर्थिक लूट होत आहे.

​महागडे बियाणे ठरले बोगस; थेट शेतातून क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा एल्गार
खंडाळा म. येथील रहिवासी शेतकरी रत्नाकर पुरुषोत्तम सिताफळे (वय ५० वर्ष) यांनी चिखली येथील कृषी केंद्राच्या दुकानातून सोयाबीन ईनोव्हेज कंपनीचे 'महादेव' (लॉट नं. १२०६०) हे बियाणे खरेदी केले होते.  कर्ज काढून त्यांनी हे महागडे बियाणे शेतात पेरले, परंतु सदर बियाणे पूर्णपणे न उगवल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
 या घटनेची माहिती मिळताच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी तातडीने रत्नाकर सिताफळे यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. सोयाबीन न उगवलेल्या त्याच ठिकाणाहून विनायक सरनाईक यांनी बियाणे कंपन्या आणि कृषी विभागाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.

​शेतकऱ्यांना तात्काळ बियाणे उपलब्ध करून द्या; अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करा: विनायक सरनाईक
शेतकऱ्यांच्या बांधावरून बोलताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक म्हणाले की, "शेतकरी आपल्या कष्टाच्या पैशातून वर्षभराच्या उत्पन्नाची आशा ठेवून बियाणे खरेदी करतो आणि पेरणी करतो. मात्र, कंपन्यांचे बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे शेतकरी कमालीचा संकटात सापडतो. अशा वेळी कंपन्यांनी कोणत्याही तांत्रिक त्रुटींचे कारण न सांगता, ताबडतोब शेतकऱ्याच्या शेताची पाहणी (व्हिजिट) करावी आणि शेतकऱ्याला दुबार पेरणीसाठी तात्काळ मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे. जर बियाणे कंपनी अशी मदत करण्यास टाळाटाळ करत असेल, तर कृषी विभागाने संबंधित कंपनीवर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत."

​टोल फ्री नंबर ठरतात 'नो रिस्पॉन्स'; शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट
शेतकऱ्यांनी जाब विचारल्यास बियाणे कंपन्यांची यंत्रणा अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहे. बियाणे उगवले नाही म्हणून शेतकरी जेव्हा कंपनीच्या थैलीवर दिलेल्या 'टोल फ्री' क्रमांकावर संपर्क साधतात, तेव्हा तिथे कोणीही फोन उचलत नाही. कंपनीचे हे प्रतिनिधी "कृषी विभागाकडे तक्रार करा" असे सांगून आपली जबाबदारी झटकत आहेत. ​कृषी विभागाची तक्रार कंपनीकडे गेल्यानंतर आणि त्यानंतर समिती प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचेपर्यंत पेरणीचा हंगाम पूर्णपणे निघून जाईल, अशी भीती निर्माण झाली आहे. 'आता शेतात तातडीने दुबार पेरणी करावी की तालुका समितीच्या चौकशीची वाट पाहत राहावे?' अशा दुहेरी कात्रीत शेतकरी अडकला आहे. कृषी विभागाने विनायक सरनाईक यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन बोगस कंपन्यांवर व दुकानांवर तात्काळ कडक कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

संबंधित सामग्री

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026
उभ्या पिकावर केळी पिकली; भाव कोसळले, उत्पादन खर्चही निघेना...

उभ्या पिकावर केळी पिकली; भाव कोसळले, उत्पादन खर्चही निघेना...

नांदेड जिल्ह्यात केळी पिकांवर अचानक पिवळावी परिस्थिती झाली आहे, ज्या कारणामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च करताना तणताना दिसून आले आहे.

Sep 05, 2026
माळवटा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

माळवटा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

वसमत तालुक्यातील माळवटा येथील 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Jul 30, 2026
केवळ 26 टक्के क्षेत्राचा भरला पीकविमा; लातूर जिल्ह्यात पाऊस 52 टक्के; खरीप पेरा 75 टक्के! 

केवळ 26 टक्के क्षेत्राचा भरला पीकविमा; लातूर जिल्ह्यात पाऊस 52 टक्के; खरीप पेरा 75 टक्के! 

Latur District Kharif Season: जुलै महिना सरत आला तरीही लातूर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले असतानाही लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीकविमा

Jul 29, 2026
पेरणीविना येरोळ परिसर काळाभोर; पावसाअभावी 15 गावांवर दुष्काळाची गडद छाया! 

पेरणीविना येरोळ परिसर काळाभोर; पावसाअभावी 15 गावांवर दुष्काळाची गडद छाया! 

Unsown Farmland: शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरातील पंधरा गावातील शेतशिवार खरीप पेरणीविना रिकामा काळाभोर दिसत असून उजाड शिवारामुळे शेतकरी धास्तावला आहे.

Jul 27, 2026