सोशल मीडिया बंदी

मोठा निर्णय...आता 16 वर्षांखालील मुलांना 'सोशल मीडिया' वापरावर बंदी

Social Media Ban: मुलांच्या मानसिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने १६ वर्षांखालील मुलांच्या समाजमाध्यम वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे

मोठा निर्णय...आता 16 वर्षांखालील मुलांना 'सोशल मीडिया' वापरावर बंदी

Social Media Ban


वेलिंग्टन (Social Media Ban) : मुलांच्या मानसिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने न्यूझीलंड सरकारने १६ वर्षांखालील मुलांच्या समाजमाध्यम वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान ख्रिस्टोफर लक्सन यांच्या पक्षाने प्रस्तावित केलेल्या विधेयकात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या (Social Media Ban) समाजमाध्यम कंपन्यांवर त्यांच्या जागतिक महसुलाच्या १० टक्क्यांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

लक्सन यांनी (Social Media Ban) समाजमाध्यमांवरील हानिकारक सामग्री आणि व्यसनाधीन तंत्रज्ञानामुळे मुलांच्या मानसिक आरोग्य, झोप, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली. मात्र, विधेयकाला संसदेत आवश्यक समर्थन मिळेल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. सत्ताधारी आघाडीतील न्यूझीलंड फर्स्ट पक्षाचे नेते विंस्टन पीटर्स यांनी प्रस्तावाला विरोध केला आहे.

मुलांना समाजमाध्यमांपासून (Social Media Ban) दूर ठेवण्याची जबाबदारी सरकारपेक्षा पालकांची असावी, असे त्यांचे मत आहे. ऑस्ट्रेलियाच्या अशाच कायद्याला त्यांनी ‘मोठे अपयश’ म्हटले. लक्सन यांनीही अंमलबजावणी आव्हानात्मक असल्याचे मान्य केले. मात्र, समस्या गंभीर असल्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित सामग्री

भाईंदरमध्ये पर्युषण पर्वावरून पुन्हा वाद; मेथीच्या भाजीवरून विद्यार्थ्याला दंड, तपोवन विद्यालयाला नोटीस

भाईंदरमध्ये पर्युषण पर्वावरून पुन्हा वाद; मेथीच्या भाजीवरून विद्यार्थ्याला दंड, तपोवन विद्यालयाला नोटीस

भाईंदरच्या तपोवन विद्यालयात मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्यावर दंडात्मक कारवाई झाल्याचा आरोप. मनसेच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाची नोटीस.

Sep 23, 2026
गणेशोत्सवात पुण्यात जड-अवजड वाहनांना २४ तास बंदी; १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान वाहतूक बदल

गणेशोत्सवात पुण्यात जड-अवजड वाहनांना २४ तास बंदी; १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान वाहतूक बदल

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान १२ प्रमुख मार्गांवर जड-अवजड वाहनांना २४ तास बंदी राहणार आहे.

Sep 10, 2026
मुंबईकरांनो, वांद्र्यात जाताय? १३ ते २० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीत मोठे बदल

मुंबईकरांनो, वांद्र्यात जाताय? १३ ते २० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीत मोठे बदल

माउंट मेरी यात्रेनिमित्त १३ ते २० सप्टेंबरदरम्यान वांद्रे परिसरात वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. अनेक मार्गांवर प्रवेशबंदी, वनवे, नो-पार्किंग आणि अवजड वाहनांवर निर्बंध असतील.

Sep 07, 2026
हिंगोली -वाशिम, अकोला,अमरावती मार्गावरील एस.टी. बसेसच्या मार्गात मोठा बदल

हिंगोली -वाशिम, अकोला,अमरावती मार्गावरील एस.टी. बसेसच्या मार्गात मोठा बदल

Hingoli Bus Route: शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने जड वाहनांच्या वाहतूक मार्गात तात्पुरता बदल केला आहे.

Aug 25, 2026
मोठ्या साखर खरेदीदारांवर सरकारचा फास; १५ दिवसांवर साठेबंदीची कुऱ्हाड

मोठ्या साखर खरेदीदारांवर सरकारचा फास; १५ दिवसांवर साठेबंदीची कुऱ्हाड

Sugar Hoarding Crisis: सणासुदीच्या काळात साखरेची वाढती मागणी आणि संभाव्य साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या साखर खरेदीदारांवर कडक निर्बंध लागू केले आहेत.

Aug 25, 2026