शफाली वर्मा

शफाली वर्मांने रचला विश्वविक्रम; पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी

Shafali Verma: पाकिस्तानने दिलेल्या 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शफालीने (Shafali Verma) डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यासह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावात षटकार..

शफाली वर्मांने रचला विश्वविक्रम; पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी

Shafali Verma

दुबई (Shafali Verma) : महिला आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय सलामीवीर शफाली वर्माने दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले. पाकिस्तानने दिलेल्या 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शफालीने (Shafali Verma) डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यासह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याची कामगिरी दोनदा करणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली. यापूर्वीही तिने पाकिस्तानविरुद्धच अशी कामगिरी केली होती.

याच सामन्यात शफालीने (Shafali Verma) आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला. अवघ्या 22 वर्षे 220 दिवसांच्या वयात तिने महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. त्यामुळे हा पराक्रम करणारी ती सर्वांत युवा फलंदाज ठरली.

याशिवाय, शफालीने (Shafali Verma) 113 डावांत 3 हजार धावा पूर्ण करत हा टप्पा सर्वांत जलद गाठणारी फलंदाज होण्याचा मानही मिळवला. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या गॅबी लुईस आणि ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली यांच्या नावावर होता. दरम्यान, पाकिस्तानचा डाव भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 55 धावांत गुंडाळला. त्यानंतर भारताने 8.5 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठत सात गडी राखून विजय मिळवला.

संबंधित सामग्री

तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली

तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली

Viatina-19 Cow Record: ब्राझीलमध्ये झालेल्या एका विशेष लिलावात भारतीय वंशाच्या नेल्लोर (ओंगोल) प्रजातीतील ‘वियाटिना-19’ या गायीने तब्बल 40 कोटी रुपयांची विक्रमी बोली, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Oct 06, 2026
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करीचा मोठा पर्दाफाश; 526 किलो अमली पदार्थांसह 5 पाकिस्तानी नागरिक ताब्यात

अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करीचा मोठा पर्दाफाश; 526 किलो अमली पदार्थांसह 5 पाकिस्तानी नागरिक ताब्यात

अरबी समुद्रात मोठी कारवाई! 526 किलो ड्रग्ज जप्त, 5 पाकिस्तानी नागरिक अटकेत; आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये.

Oct 02, 2026
शुभमन गिलचा विक्रमी द्विशतक; वनडेमधील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग

शुभमन गिलचा विक्रमी द्विशतक; वनडेमधील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग

Shubman Gill Record: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावत इतिहास रचला. गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजने दिलेल्या 406 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग

Oct 01, 2026
स्मृती मंधानाने सुवर्णपदकाच्या सामन्यात रचला विश्वविक्रम!

स्मृती मंधानाने सुवर्णपदकाच्या सामन्यात रचला विश्वविक्रम!

Smriti Mandhana Record: आशियाई क्रीडा स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात खेळताना मंधानाने 11 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. हा पराक्रम करणारी ती महिला क्रिकेटर..

Sep 22, 2026
अंबरनाथमध्ये भारत-पाकिस्तानचे दोन्ही पासपोर्ट बाळगल्याचा आरोप; ३८ वर्षीय चांद अलीला अटक; मुंबई ATS कडूनही तपास सुरू

अंबरनाथमध्ये भारत-पाकिस्तानचे दोन्ही पासपोर्ट बाळगल्याचा आरोप; ३८ वर्षीय चांद अलीला अटक; मुंबई ATS कडूनही तपास सुरू

अंबरनाथमध्ये भारत-पाकिस्तानचे दोन्ही पासपोर्ट बाळगल्याच्या आरोपावरून ३८ वर्षीय चांद अलीला अटक. हिललाईन पोलिसांसह मुंबई ATSकडून चौकशी सुरू.

Sep 20, 2026