Seemanchal Express

आईच्या कुशीतून निसटले ९ महिन्यांचे बाळ; धावत्या सीमांचल एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू

सीमांचल एक्स्प्रेसमधून प्रवास करताना ९ महिन्यांचे बाळ आपत्कालीन खिडकीतून खाली पडले. २३ तासांच्या शोधानंतर फैजुल्लाहपूरजवळ मृतदेह आढळला.

आईच्या कुशीतून निसटले ९ महिन्यांचे बाळ; धावत्या सीमांचल एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू

Seemanchal Express

आईच्या कुशीतून बाळ आपत्कालीन खिडकीतून खाली पडले; फैजुल्लाहपूर स्थानकाजवळ GRP-RPFची शोधमोहीम

नवी दिल्ली/प्रयागराज : धावत्या रेल्वेतून प्रवास करताना खिडकीजवळ लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन वारंवार केले जाते. मात्र, दिल्लीहून बिहारकडे निघालेल्या सीमांचल एक्स्प्रेसमध्ये एका कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग ओढवला. आईच्या कुशीत दूध पिताना झोपलेल्या नऊ महिन्यांच्या बाळाचा हातातून तोल गेला आणि ते धावत्या रेल्वेच्या आपत्कालीन खिडकीतून खाली पडले. उत्तर प्रदेशातील फैजुल्लाहपूर रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेनंतर तब्बल २३ तासांनी बाळाचा मृतदेह झुडपांमध्ये आढळून आला.

दिल्लीतील सितापुरी परिसरात राहणारे मोहन कुमार हे पत्नी काजल आणि नऊ महिन्यांच्या मुलासह बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील सालौना गावाकडे निघाले होते. आनंद विहारहून सीमांचल एक्स्प्रेसच्या S-1 डब्यातून त्यांचा प्रवास सुरू होता. त्यांना ६१ आणि ६४ क्रमांकाचे बर्थ मिळाले होते.

पोलिसांच्या तपासानुसार, प्रवासादरम्यान मोहन कुमार शौचालयात गेले होते. त्यावेळी काजल आपल्या बाळाला दूध पाजत होती. दूध पिताना तिला झोप लागली. त्याचदरम्यान तिच्या कुशीत असलेले बाळ मागे सरकले आणि आपत्कालीन खिडकीतून धावत्या रेल्वेबाहेर पडले.

मोहन कुमार परतल्यानंतर बाळ दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पती-पत्नीने संपूर्ण डब्यात बाळाचा शोध घेतला; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. बाळ रेल्वेतून खाली पडल्याची शक्यता लक्षात येताच मोहन यांनी आपत्कालीन साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखल्याचे सांगण्यात आले.

प्रयागराज येथे रेल्वे पोहोचल्यानंतर दांपत्याने GRPकडे घटनेची माहिती दिली. त्यानंतर GRP आणि RPFच्या पथकांनी रेल्वे मार्गालगत शोधमोहीम सुरू केली. रात्रभर शोध घेऊनही बाळाचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास फैजुल्लाहपूर स्थानकाजवळील झुडपांमध्ये बाळाचा मृतदेह आढळून आला.

दाट झाडी आणि परिसरात साचलेल्या पाण्यामुळे शोधमोहीम राबविण्यात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचेही तपासात समोर आले.

मृतदेह सापडल्यानंतर शवविच्छेदनाच्या प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे आई-वडिलांना रात्री स्थानकावरच थांबावे लागले. या प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत नाराजी व्यक्त केली.

रेल्वे प्रवासादरम्यान लहान मुलांना खिडकीपासून दूर ठेवणे आणि आपत्कालीन खिडक्यांजवळ विशेष काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

संबंधित सामग्री

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
वर्ध्यात एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राची मोठी भेट; जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी चालना

वर्ध्यात एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राची मोठी भेट; जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी चालना

Wardha SRPF Training Centre: राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) सर्व गटांसाठी वर्धा येथे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

Oct 01, 2026