Protest Ends

NEET पेपरफुटी आंदोलन स्थगित; जंतरमंतरवरील ३६ दिवसांचे विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर संपले

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर ३६ दिवसांनंतर मागे घेण्यात आले आहे.

NEET पेपरफुटी आंदोलन स्थगित; जंतरमंतरवरील ३६ दिवसांचे विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर संपले

कॉक्रोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांची घोषणा; मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलकांना घरी परतण्याचे आवाहन

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर ३६ दिवसांनंतर मागे घेण्यात आले आहे. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पूर्ण झाल्यानंतर आंदोलन समाप्त करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी संयुक्तपणे आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. यावेळी आशुतोष रांका यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन करत, "आपल्या सर्व प्रमुख मागण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आंदोलन आता मागे घ्यावे आणि सर्वांनी शांततापूर्वक आपल्या घरी परतावे," असे सांगितले.

नीट पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थी गेल्या ३६ दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर येथे आंदोलन करत होते. मागण्या मान्य झाल्यानंतर अखेर हे आंदोलन अधिकृतपणे समाप्त करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

संबंधित सामग्री

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल सिलेंडर 62.50 रुपयांनी महाग

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल सिलेंडर 62.50 रुपयांनी महाग

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल LPG सिलेंडर 62.50 रुपयांनी महागला. दिल्लीतील 19 किलोचा सिलेंडर 2810 रुपयांवर पोहोचला, तर घरगुती सिलेंडरचे दर स्थिर आहेत.

Oct 01, 2026