PNB Scam

PNB च्या तिजोरीत मोठा घोटाळा; ७.४ कोटींच्या खऱ्या नोटांऐवजी बनावट नोटा

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) मुख्य शाखेतील तिजोरीतून कोट्यवधी रुपयांच्या खऱ्या नोटा गायब करून त्यांच्या जागी बनावट नोटा ठेवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

PNB च्या तिजोरीत मोठा घोटाळा; ७.४ कोटींच्या खऱ्या नोटांऐवजी बनावट नोटा

PNB Scam

सहारनपूरच्या मुख्य शाखेत प्रकार उघड; तीन वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात, SIT कडून तपास सुरू

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) मुख्य शाखेतील तिजोरीतून कोट्यवधी रुपयांच्या खऱ्या नोटा गायब करून त्यांच्या जागी बनावट नोटा ठेवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तब्बल ७.४ कोटी रुपयांच्या रोख रकमेबाबत हा घोटाळा असल्याचे समोर येत असून, बँकेच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मुख्य शाखेतील Currency Chest अर्थात रोख तिजोरीची तपासणी आणि ऑडिट सुरू असताना अधिकाऱ्यांना कॅश बंडलमध्ये विसंगती आढळली. तपासणीदरम्यान काही बंडलमध्ये अस्सल नोटांच्या ऐवजी बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा प्रकार साधी चोरी नसून बँकेतील व्यक्ती किंवा कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणला असण्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी PNB चे नोडल अधिकारी अरुण कुमार चौबे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक रवी कुमार, करन्सी चेस्ट व्यवस्थापक सुशील शर्मा आणि अमित कुमार यांची मुख्य संशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे.

PNB च्या मुख्य उपव्यवस्थापक निशा सिंह यांच्या माहितीनुसार, १० ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) पाठवण्यात आलेल्या रोख रकमेत ४.३६ लाख रुपयांची तफावत आढळली. या विसंगतीची पडताळणी करत असताना तिजोरीतील रोख रकमेबाबत मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन केले आहे. सहारनपूरचे डीआयजी अभिषेक यांनी याबाबत माहिती देताना संशयितांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे सांगितले. सध्या तिजोरीतील नोटांची मोजदाद सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतर अपहार झालेली संपूर्ण रक्कम जप्त करण्याच्या दिशेने कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, बँकेच्या तिजोरीतून अस्सल नोटा बाहेर काढून त्यांच्या जागी बनावट नोटा नेमक्या कशा ठेवण्यात आल्या, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. यासाठी बँकेतील आर्थिक व्यवहार, जुन्या ऑडिट अहवालांची नोंद आणि Currency Chest परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तिजोरी आणि लॉकरच्या चाव्यांचा ताबा कोणाकडे होता, याचीही चौकशी केली जात असून या प्रकरणामागील संपूर्ण रॅकेटचा उलगडा करण्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहे.

संबंधित सामग्री

चार महिन्यांत तब्बल 22 जणांना फाशीची शिक्षा; न्यायाधीश पुन्हा चर्चेत

चार महिन्यांत तब्बल 22 जणांना फाशीची शिक्षा; न्यायाधीश पुन्हा चर्चेत

Agra Court Death Sentence: मुझफ्फरनगर ‘फास्ट ट्रॅक कोर्ट जिल्हा व सत्र न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्याने ते यापूर्वी चर्चेत

Sep 08, 2026
त्रिपुराचे DGP अनुराग धनखड यांचा संशयास्पद मृत्यू; पोलीस मुख्यालयातील केबिनमध्ये आढळला मृतदेह

त्रिपुराचे DGP अनुराग धनखड यांचा संशयास्पद मृत्यू; पोलीस मुख्यालयातील केबिनमध्ये आढळला मृतदेह

त्रिपुराचे पोलीस महासंचालक (DGP) अनुराग धनखड यांचा मृतदेह अगरतळा येथील पोलीस मुख्यालयात संशयास्पद परिस्थितीत आढळून आला.

Jul 20, 2026
अकोल्यात बनावट चलनी नोटांचे रॅकेट उध्वस्त; 97 हजारांच्या नकली नोटांसह तिघांना अटक

अकोल्यात बनावट चलनी नोटांचे रॅकेट उध्वस्त; 97 हजारांच्या नकली नोटांसह तिघांना अटक

अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेने बनावट भारतीय चलनी नोटांच्या अवैध रॅकेटवर मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.

Jul 18, 2026
राम मंदिर देणगी प्रकरणावरून भास्कर जाधवांचा भाजपवर घणाघात; ‘गावागावात जाऊन जनतेसमोर हा मुद्दा मांडणार’

राम मंदिर देणगी प्रकरणावरून भास्कर जाधवांचा भाजपवर घणाघात; ‘गावागावात जाऊन जनतेसमोर हा मुद्दा मांडणार’

अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्या, पैसे आणि मौल्यवान दागिन्यांशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे.

Jul 13, 2026