Operation Sindoor

‘ऑपरेशन सिंदूर’ सायबर हल्ला तपासाचा जुन्नरपर्यंत तपास; NIAकडून दोघे ताब्यात, मनी ट्रान्सफर व्यवहारांची चौकशी

‘ऑपरेशन सिंदूर’च्या कालावधीत केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्सवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या तपासाची व्याप्ती पुणे जिल्ह्यातील जुन्नरपर्यंत पोहोचली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ सायबर हल्ला तपासाचा जुन्नरपर्यंत तपास; NIAकडून दोघे ताब्यात, मनी ट्रान्सफर व्यवहारांची चौकशी

Operation Sindoor

केंद्राच्या ५४ वेबसाइट्सवर कथित DDoS हल्ल्याचा तपास; जुन्नरमध्ये NIAची शोधमोहीम, तीन लॅपटॉप आणि पाच मोबाईल जप्त

जुन्नर : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कालावधीत केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्सवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या तपासाची व्याप्ती पुणे जिल्ह्यातील जुन्नरपर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) जुन्नरच्या तांदूळ बाजार परिसरातील दोन स्थानिक रहिवाशांना संशयास्पद मनी ट्रान्सफर व्यवहारांबाबत चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दोघांविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान केंद्र सरकारच्या तब्बल ५४ महत्त्वाच्या वेबसाइट्सना DDoS (Distributed Denial of Service) सायबर हल्ल्याचे लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा तपास NIAकडून सुरू असून, त्याच तपासाचा भाग म्हणून देशातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी २४ ऑगस्ट रोजी शोधमोहीम राबवण्यात आली.

जुन्नरमधील दोघांची मनी ट्रान्सफर व्यवहारांवरून चौकशी

NIAच्या तपास पथकाने जुन्नरच्या तांदूळ बाजार परिसरात कारवाई करत दोन स्थानिक रहिवाशांना चौकशीसाठी सोबत नेले. त्यांच्या काही मनी ट्रान्सफर व्यवहारांचा तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

मात्र, या कारवाईनंतरही जुन्नर पोलीस ठाण्यात संबंधित दोघांविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे NIAच्या तपासात या दोघांची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता नाही.

तीन लॅपटॉप, पाच मोबाईलसह डिजिटल साहित्य जप्त

NIAने देशभरात केलेल्या या संयुक्त कारवाईत तीन लॅपटॉप, पाच मोबाईल फोन आणि इतर डिजिटल साहित्य ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, या जप्त करण्यात आलेल्या साहित्यापैकी नेमके कोणते उपकरण किंवा साहित्य जुन्नरमधून मिळाले, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

त्यामुळे ताब्यात घेतलेल्या दोघांचा कथित सायबर हल्ल्याशी थेट संबंध आहे का, तसेच त्यांच्या मनी ट्रान्सफर व्यवहारांचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, हे NIAच्या पुढील तपासानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026