सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरणाचा मुद्दा; मशिदीचा भाग हटवण्यावरून मुस्लिम समाजात दोन मतप्रवाह
उज्जैनच्या अब्दालपुरा परिसरातील शाही मशिदीचा काही भाग हटवण्याच्या प्रशासनाच्या कारवाईवरून तणाव निर्माण झाला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक नागरिकांसह मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने मशिदीबाहेर एकत्र येत आंदोलन करत आहेत. दरम्यान, या मुद्द्यावर मुस्लिम समाजातही दोन वेगवेगळे मतप्रवाह समोर आले असून, एका गटाने संबंधित भाग स्वतःहून हटवण्याची तयारी दर्शवली आहे, तर दुसऱ्या गटाने कारवाईला विरोध केला आहे.
रविवारी रात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तात जेसीबी आणि पोकलँड मशिनरी घटनास्थळी पोहोचल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली. यानंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासन आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी परिसरात सुमारे 2 हजार पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत.
📍UJJAIN, MADHYA PRADESH | Police personnel urge protesters not to pelt stones as they try to speak to the crowd after protests erupted over demolition of a portion of Shahi Masjid for a road-widening project pic.twitter.com/tzpCJ7o9Wc
— The Tatva (@thetatvaindia) September 28, 2026
शाही मशिदीच्या 500 मीटर परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले असून, या भागातील वाहतूक तसेच नागरिकांची ये-जा प्रतिबंधित करण्यात आली आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनीही सहभाग घेतल्याचे दिसून आले.
पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी संवाद साधत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही काळ तणाव कमी झाला. मात्र, सोमवारच्या दिवशीही परिसरात आंदोलन सुरूच राहिले. यावेळी संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
#BREAKING
— Nabila Jamal (@nabilajamal_) September 28, 2026
A portion of a nearly 600-year-old mosque is all set to be demolished in Madhya Pradesh’s Ujjain, triggering huge protests
Authorities had planned to demolish part of the Shahi Masjid for a road-widening project. Massive crowds gathered through the night, attempting… pic.twitter.com/DDhy5NUxrU
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरणाचा मुद्दा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कंठाल चौक ते गोपाल मंदिर या सुमारे 900 मीटर अंतराच्या रस्त्याचे 15 मीटरपर्यंत रुंदीकरण करण्याची योजना आहे. या प्रस्तावित रुंदीकरणाच्या मार्गात सात धार्मिक स्थळे येत होती. त्यापैकी बहुतांश धार्मिक स्थळे संबंधितांच्या सहमतीने हटवण्यात आली आहेत.
Breaking
— Ghazala Ahmad (@ghazalaahmad5) September 28, 2026
Volunteers at Shahi Masjid in MP’s Ujjain have begun demolishing 3 feet of the mosque's hanging slab to avert bulldozer action as tensions flare up.
For two nights, people had formed a night vigil to stop the demolition, with hundreds of people camping inside the mosque pic.twitter.com/4zcx0oXfdM
मात्र, खडे हनुमान मंदिरापासून गोपाल मंदिरापर्यंतच्या मार्गावरील एका मस्जिदीसह खडे हनुमान मंदिर आणि शाही मशिदीचा मुद्दा कायम राहिल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. शाही मशिदीचा काही भाग हटवण्याच्या कारवाईवरून सध्या स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संघर्षाची स्थिती निर्माण झाली असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.
Stone-pelting was reported in Ujjain, Madhya Pradesh amid protests against the proposed removal of the Shahi Masjid for the Simhastha Kumbh preparations. Police fired tear gas shells to control the crowd. pic.twitter.com/17d2LhjMeL
— Piyush Rai (@Benarasiyaa) September 28, 2026