ISRO Recruitment 2026

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये 93 जागांसाठी भरती; 17 ऑगस्टपर्यंत अर्ज

अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना GATE स्कोअर आणि मुलाखत या दोन्ही घटकांना प्रत्येकी 50 टक्के वेटेज दिले जाणार आहे.

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये 93 जागांसाठी भरती; 17 ऑगस्टपर्यंत अर्ज

ISRO Recruitment 2026

Electronics, Mechanical, Computer Scienceसह 8 इंजिनिअरिंग डिसिप्लिनमध्ये संधी; GATE 2025 किंवा GATE 2026 स्कोअर असलेल्या उमेदवारांना अर्जाची संधी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) सायंटिस्ट आणि इंजिनिअर म्हणून करिअर करण्याची इच्छा असलेल्या इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. ISRO Centralised Recruitment Board (ICRB) मार्फत Scientist/Engineer ‘SC’ पदाच्या एकूण 93 जागांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना 17 ऑगस्ट 2026 पर्यंत इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवरील भरती पोर्टलवर अर्ज करता येणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड GATE 2025 किंवा GATE 2026 च्या वैध स्कोअरच्या आधारे केली जाणार आहे. संबंधित पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा GATE स्कोअर त्याच इंजिनिअरिंग डिसिप्लिनशी संबंधित असणे आवश्यक आहे.

कोणत्या इंजिनिअरिंग शाखांसाठी किती जागा?

एकूण 93 पदांमध्ये सर्वाधिक जागा Electronics Engineering साठी आहेत. शाखानिहाय जागांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:

  • Electronics – 35 जागा
  • Mechanical – 26 जागा
  • Computer Science – 13 जागा
  • Civil – 10 जागा
  • Electrical – 4 जागा
  • Refrigeration & Air Conditioning – 2 जागा
  • Architecture – 2 जागा
  • Civil PRL Autonomous Body – 1 जागा

इस्रोच्या कोणत्या केंद्रांवर मिळू शकते नियुक्ती?

निवड झाल्यानंतर उमेदवारांची नियुक्ती इस्रोच्या विविध केंद्रांमध्ये केली जाऊ शकते. यामध्ये बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, तिरुवनंतपुरम, श्रीहरिकोटा, महेंद्रगिरी, हसन आणि वलियामला या ठिकाणांचा समावेश आहे.

कोण करू शकतो अर्ज?

या पदांसाठी संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील निर्धारित BE किंवा BTech पदवी असणे आवश्यक आहे. त्यासोबत संबंधित विषयातील GATE 2025 किंवा GATE 2026 चा वैध स्कोअर असणे बंधनकारक आहे. ज्या शाखेसाठी अर्ज केला आहे, त्याच विषयाशी संबंधित GATE स्कोअर ग्राह्य धरला जाणार आहे.

याशिवाय National Career Service Portal वर नोंदणीकृत आणि पात्र उमेदवारांनाही या भरती प्रक्रियेत अर्ज करता येणार आहे.

GATE स्कोअरवरून मुलाखतीसाठी निवड

मुलाखतीच्या टप्प्यासाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग GATE स्कोअरच्या आधारे केली जाणार आहे. इस्रोच्या नियमानुसार केवळ GATE मार्क्स किंवा रँक नव्हे, तर GATE स्कोअर निवडीचा आधार असेल. मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड 1:7 या प्रमाणात केली जाणार आहे.

मुलाखतीदरम्यान उमेदवाराचे तांत्रिक ज्ञान, संबंधित विषयाची समज, सादरीकरण आणि संवाद कौशल्य, आकलन क्षमता तसेच शैक्षणिक कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल.

अंतिम निवडीत GATE आणि मुलाखतीला समान महत्त्व

अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना GATE स्कोअर आणि मुलाखत या दोन्ही घटकांना प्रत्येकी 50 टक्के वेटेज दिले जाणार आहे. अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण किमान 60 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना लागू नियमांनुसार पात्रता निकषांमध्ये सवलत मिळेल.

अर्जामध्ये नमूद केलेल्या GATE स्कोअरची इस्रोकडून पडताळणी केली जाणार आहे. अर्जात चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती आढळल्यास संबंधित उमेदवारावर नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.

17 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांनी isro.gov.in वरील भरती पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. अर्ज करताना वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि GATE स्कोअरशी संबंधित माहिती अचूकपणे भरावी लागेल.

नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणारा Registration Number पुढील भरती प्रक्रियेसाठी जतन करणे आवश्यक आहे. तसेच अर्जामध्ये वैध ई-मेल आयडी देणे गरजेचे आहे, कारण भरतीशी संबंधित महत्त्वाच्या सूचना त्याच माध्यमातून पाठवल्या जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 ऑगस्ट 2026 आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर फडणवीसांचा टोला; “मुद्दे किती खरे आहेत, हे तपासून पाहा”

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर फडणवीसांचा टोला; “मुद्दे किती खरे आहेत, हे तपासून पाहा”

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर फडणवीसांचा टोला; उपवर्गीकरण आणि अग्निवीरांच्या सरकारी सेवेबाबतही मोठी माहिती.

Sep 29, 2026
इस्रोचा इशारा...चक्रीवादळाचा धोका उंबरठ्यावर

इस्रोचा इशारा...चक्रीवादळाचा धोका उंबरठ्यावर

Indian Cyclone: ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तीन तीव्र चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे इस्रोच्या अभ्यासातून समोर आले आहे. इस्रोच्या संशोधकांनी मागील सुमारे चार दशकांतील समुद्र..

Sep 16, 2026
MPSC चा मोठा निर्णय; गट-क पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

MPSC चा मोठा निर्णय; गट-क पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी घेण्यात येणार

Sep 10, 2026
जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये ‘पायलट’ पदांची भरती; १२ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये ‘पायलट’ पदांची भरती; १२ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

JNPAच्या सागरी विभागात योजना-१ आणि योजना-२ अंतर्गत पायलट पदांची करार पद्धतीने भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Sep 09, 2026