Heathrow Airport,

हिथ्रो विमानतळावरील सायबर हल्ल्याचा फटका; एकनाथ शिंदेंचे ६ अधिकारी झ्युरिकमध्ये अडकले

हिथ्रो विमानतळावरील सायबर हल्ल्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली. एकनाथ शिंदेंच्या कार्यालयातील सहा अधिकारी झ्युरिकमध्ये अडकले असून १,००० हून अधिक उड्डाणे रद्द झाली.

हिथ्रो विमानतळावरील सायबर हल्ल्याचा फटका; एकनाथ शिंदेंचे ६ अधिकारी झ्युरिकमध्ये अडकले

Heathrow Airport,

एअर ट्रॅफिक सिस्टीममध्ये बिघाड; १,००० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले

लंडनमधील प्रसिद्ध हिथ्रो विमानतळावर झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्यामुळे ब्रिटनमधील हवाई वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या घटनेनंतर विमानसेवा विस्कळीत झाली असून अनेक उड्डाणांना १० ते १२ तासांचा विलंब होत आहे. या गोंधळाचा परिणाम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांवरही झाला आहे.

पुरस्कार सोहळ्यासाठी लंडनला गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील ओएसडी आणि फोटोग्राफरसह सहा अधिकाऱ्यांचे विमान हिथ्रो विमानतळावर उतरू शकले नाही. त्यामुळे विमान स्वित्झर्लंडमधील झ्युरिककडे वळवण्यात आले. परिणामी हे सहा अधिकारी सध्या झ्युरिकमध्येच अडकले आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने प्रवास करत असून त्यांचे विमान नियोजित वेळेनुसार असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी आणि फोटोग्राफरसह सहा अधिकाऱ्यांचे विमान हिथ्रो येथे लँडिंग करू शकले नाही. त्यानंतर विमानाचे तातडीने झ्युरिककडे डायव्हर्शन करण्यात आले. लंडनमध्ये सध्या सकाळचे साडेपाच वाजले असून, स्थानिक प्रशासनाकडून या अधिकाऱ्यांना पहाटे सातच्या सुमारास लंडनला आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे ब्रिटनची हवाई वाहतूक विस्कळीत

यूकेमधील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने विमानसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. ब्रिटनमधील या संकटाचा परिणाम जगभरातील हवाई वाहतुकीवरही जाणवत आहे.

ब्रिटनची प्रमुख एअर ट्रॅफिक कंट्रोल संस्था असलेल्या 'NATS'च्या सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने यूकेमधील १५ हून अधिक प्रमुख विमानतळांवरील विमानसेवा ठप्प झाली आहे. या तांत्रिक अडचणीमुळे आतापर्यंत १,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली असून हजारो प्रवासी विविध विमानतळांवर अडकले आहेत.

या अभूतपूर्व परिस्थितीमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल NATS प्रशासनाने अधिकृतपणे माफी मागितली आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी तसेच तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
“एकनाथ शिंदेंमुळेच भाजप आज सत्तेत; अन्यथा पक्षाचे अस्तित्व उरले नसते” — चंद्रकांत रघुवंशींच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ

“एकनाथ शिंदेंमुळेच भाजप आज सत्तेत; अन्यथा पक्षाचे अस्तित्व उरले नसते” — चंद्रकांत रघुवंशींच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ

चंद्रकांत रघुवंशी यांनी एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत आल्याचा दावा केला. विजयकुमार गावितांवरही टीका; महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत.

Sep 28, 2026