युरोप डिझेल संकट

युरोपसमोर डिझेल संकट! भारतीय रिफायनरीज ठरल्या युरोपचा आधार

Europe Diesel Crisis: कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर युरोपसमोर गंभीर ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. रशियाकडून होणारा इंधन पुरवठा दीर्घकाळापासून खंडित असताना, अमेरिकेकडून युरोपला..

युरोपसमोर डिझेल संकट! भारतीय रिफायनरीज ठरल्या युरोपचा आधार

Europe Diesel Crisis

रशियाचा पुरवठा खंडित; अमेरिकेची निर्यात घटली

नवी दिल्ली (Europe Diesel Crisis) : कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर युरोपसमोर गंभीर ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. रशियाकडून होणारा इंधन पुरवठा दीर्घकाळापासून खंडित असताना, अमेरिकेकडून युरोपला होणाऱ्या डिझेलच्या निर्यातीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे (Europe Diesel Crisis) युरोपची डिझेलची गरज भागवण्यासाठी आता भारतावरील अवलंबित्व वाढताना दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा विश्लेषण संस्था ‘व्होर्टेक्सा’च्या ताज्या आकडेवारीनुसार, या परिस्थितीत भारतीय रिफायनरीज युरोपला डिझेलचा पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विशेष म्हणजे, (Europe Diesel Crisis) रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून त्यातून पेट्रोलियम उत्पादने तयार केल्याबद्दल याच युरोपकडून भारतावर सातत्याने टीका करण्यात आली होती. भारत रशियाला अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचा आरोपही काही युरोपीय देशांकडून करण्यात आला होता.

बाब-अल-मंदेब मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

मार्च आणि एप्रिल महिन्यात पश्चिम आशियातील वाढलेल्या तणावाचा परिणाम ‘बाब-अल-मंदेब’ या महत्त्वाच्या सागरी मार्गावर झाला होता. त्यामुळे या मार्गावरील व्यापार जवळपास ठप्प झाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात या मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आली. ऑगस्टमध्ये या मार्गावरून युरोपच्या दिशेने जाणाऱ्या जहाजांमधून दररोज सुमारे २ लाख बॅरल डिझेल आणि गॅसऑइलची वाहतूक झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

भारताची भक्कम रिफायनिंग क्षमता

भारताने गेल्या काही वर्षांत पेट्रोलियम शुद्धीकरणाच्या क्षेत्रात आपली क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. भारत हा जगातील प्रमुख रिफायनिंग हबपैकी एक असून, देशाची एकूण स्थापित वार्षिक रिफायनिंग क्षमता सुमारे 25.81 कोटी टन (258.1 दशलक्ष टन) आहे. देशातील ही मोठी रिफायनिंग क्षमता केवळ देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यापुरती मर्यादित नसून, भारताला पेट्रोलियम उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्याची क्षमता देते.

6.15 कोटी टन पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने सुमारे 6.15 कोटी टन पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात केली आहे. त्यामुळे जागतिक इंधन बाजारपेठेत भारताचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. रशियाकडून स्वस्त दरात मिळणाऱ्या कच्च्या तेलाचे भारतातील रिफायनरीजमध्ये शुद्धीकरण करून त्यापासून तयार होणारी (Europe Diesel Crisis) पेट्रोलियम उत्पादने विविध देशांना निर्यात केली जात आहेत. आता युरोपसमोर इंधनाचा तुटवडा निर्माण होत असताना, भारतीय रिफायनरीज युरोपसाठी महत्त्वाचा इंधन स्रोत ठरत असल्याचे चित्र आहे.

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
जागतिक ऊर्जा संकट; 'या' देशात पेट्रोल-डिझेल 17 टक्क्यांपर्यंत महाग!

जागतिक ऊर्जा संकट; 'या' देशात पेट्रोल-डिझेल 17 टक्क्यांपर्यंत महाग!

Global Energy Crisis: मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होत असताना अनेक देशांमध्ये इंधनाच्या दरवाढीचा फटका बसू लागला आहे. वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि वाहतूक

Sep 22, 2026
भारतावर 100 टक्के टॅरिफचा धोका; रशियन तेलावरून अमेरिका-भारत आमनेसामने

भारतावर 100 टक्के टॅरिफचा धोका; रशियन तेलावरून अमेरिका-भारत आमनेसामने

India 100 percent Tariff: रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देणारे ‘लिंडसी ओ. ग्रॅहम यांचा रशिया आणि इराण

Sep 17, 2026
रात्री 8 नंतर लॉकडाऊन? पाकिस्तानातील ‘स्मार्ट लॉकडाऊन’च्या चर्चेचे नेमके सत्य काय?

रात्री 8 नंतर लॉकडाऊन? पाकिस्तानातील ‘स्मार्ट लॉकडाऊन’च्या चर्चेचे नेमके सत्य काय?

इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात चार दिवसांचा कामाचा आठवडा, सरकारी वाहनांवर निर्बंध आणि बाजारपेठांच्या वेळेत कपातीचे प्रस्ताव चर्चेत आहेत.

Sep 16, 2026