Delhi Protest

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात; २३ जुलैला 'महाराष्ट्र बंद'ची प्रकाश आंबेडकरांची हाक

राजधानी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा प्रभाव आता देशभर उमटू लागला.

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात; २३ जुलैला 'महाराष्ट्र बंद'ची प्रकाश आंबेडकरांची हाक

Delhi Protest

जंतर-मंतरवरील लाठीचार्जनंतर विरोधक आक्रमक; विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विविध पक्ष आणि संघटनांची भूमिका तीव्र

राजधानी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा प्रभाव आता देशभर उमटू लागला असून या आंदोलनाला विविध विरोधी राजकीय पक्षांकडून उघड पाठिंबा मिळताना दिसत आहे. जंतर-मंतर परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते आंदोलनस्थळी दाखल होत असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्या दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची घोषणा केली आहे.

जंतर-मंतर आणि संसद परिसरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या घटनेचा निषेध नोंदवत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समविचारी राजकीय पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांना २३ जुलै रोजी होणाऱ्या 'महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी होण्याचे आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीतील आंदोलनातील घडामोडींनंतर महाराष्ट्रातही या मुद्द्यावर वातावरण तापू लागल्याचे चित्र दिसत आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भारतीय नागरिकांवरच सरकारने कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी शेतकरी आंदोलनालाही सरकारने विविध विशेषणांनी लक्ष्य केल्याचा उल्लेख करत, शेतकऱ्यांना 'अर्बन नक्षली' असे संबोधण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, दिल्लीतील आंदोलनाला महाराष्ट्रातील विविध भागांतूनही समर्थन व्यक्त केले जात आहे. अहिल्यानगरमध्ये आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. रिमझिम पावसातही आंदोलन सुरू ठेवत कार्यकर्त्यांनी 'मोदी हटाव देश बचाव', 'हम क्या चाहते आझादी' आणि 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026