Arvind Kejriwal

E20 पेट्रोलवरून दिल्लीत राजकीय संघर्ष; पंतप्रधान निवासस्थानाकडे केजरीवालांचा मोर्चा, फिरोजशाह रोडवर ठिय्या

देशभरात E20 पेट्रोल लागू करण्याच्या निर्णयावरून राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

E20 पेट्रोलवरून दिल्लीत राजकीय संघर्ष; पंतप्रधान निवासस्थानाकडे केजरीवालांचा मोर्चा, फिरोजशाह रोडवर ठिय्या

Arvind Kejriwal

E20 इंधनाविरोधात आम आदमी पक्षाचा आक्रमक पवित्रा; २.३० लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन घेऊन पंतप्रधानांच्या भेटीची मागणी, ट्रान्सपोर्ट युनियनचाही संसदेकडे मोर्चाचा इशारा

देशभरात E20 पेट्रोल लागू करण्याच्या निर्णयावरून राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाने आंदोलन छेडले असून, पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी समर्थकांसह पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला आहे. दरम्यान, ट्रान्सपोर्ट युनियननेही E20 पेट्रोलच्या विरोधात संसदेकडे मोर्चा काढण्याची तयारी दर्शविल्याने या मुद्द्यावरचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

आम आदमी पक्षाच्या मते, E20 पेट्रोल देशभरात लागू करताना केंद्र सरकारने सामान्य नागरिक आणि कोट्यवधी वाहनधारकांच्या अडचणींचा पुरेसा विचार केलेला नाही. विशेषतः जुन्या वाहनांवर या इंधनाचा काय परिणाम होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून, या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यालयातून कार्यकर्त्यांसह पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दिशेने मोर्चा सुरू केला. मात्र, फिरोजशाह रोड येथे दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा अडवला. संबंधित आंदोलनासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोर्चा रोखण्यात आल्यानंतरही केजरीवाल यांनी आंदोलन मागे घेतले नाही. त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि शेकडो समर्थकांसह फिरोजशाह रोडवरच ठिय्या आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

या आंदोलनात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, ते २.३० लाखांहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन घेऊन आले असून, सरकारने जनतेवर E20 पेट्रोलची सक्ती तात्काळ थांबवावी. तसेच आपण केवळ पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी येथे आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, E20 पेट्रोलविरोधात ट्रान्सपोर्ट युनियननेही संसदेकडे मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज दिवसभर दिल्लीत या विषयावर राजकीय आणि सामाजिक घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
१००% इथेनॉलवर धावणार टोयोटाची इनोव्हा; ऑक्टोबरमध्ये लॉन्च, गडकरींचा मोठा दावा

१००% इथेनॉलवर धावणार टोयोटाची इनोव्हा; ऑक्टोबरमध्ये लॉन्च, गडकरींचा मोठा दावा

ऑक्टोबरमध्ये १००% इथेनॉलवर चालणारी टोयोटा इनोव्हा लॉन्च होणार असल्याची गडकरींची घोषणा. पेट्रोलची गरज नाही, खर्च ₹२५ प्रतिलिटरइतका असल्याचा दावा.

Sep 27, 2026
हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा सन्मान; मराठीतून मांडली महाराष्ट्राची विकासगाथा

हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा सन्मान; मराठीतून मांडली महाराष्ट्राची विकासगाथा

हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा सन्मान झाला. ‘लाडकी बहीण’, ‘शासन आपल्या दारी’, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि भारत-ब्रिटन संबंधांवर त्यांनी भाष्य केले.

Sep 10, 2026
आपले सरकार सेवा केंद्रांची अचानक तपासणी; अनियमिततेवर होणार कारवाई

आपले सरकार सेवा केंद्रांची अचानक तपासणी; अनियमिततेवर होणार कारवाई

Aaple Sarkar Seva Kendra: आपले सरकार सेवा केंद्रांमधून नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची आपले सरकार सेवा केंद्र पाहणी

Sep 04, 2026
‘आपली एसटी’ ॲपचा कारभार विस्कळीत; बसचे चुकीचे लोकेशन, वेळेची माहितीही अविश्वसनीय

‘आपली एसटी’ ॲपचा कारभार विस्कळीत; बसचे चुकीचे लोकेशन, वेळेची माहितीही अविश्वसनीय

एसटी बस कुठे आहे, ती स्थानकावर किती वेळात पोहोचणार आहे, याची माहिती प्रवाशांना घरबसल्या मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘आपली एसटी’ मोबाइल ॲपवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sep 04, 2026