अखिलेश यादव

भाषेचा आदर करा, राजकारण नको: अखिलेश यादव

Akhilesh Yadav: मुंबईतील रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली. प्रत्येक राज्याच्या मातृभाषेचा आदर आणि संवर्धन

भाषेचा आदर करा, राजकारण नको: अखिलेश यादव

Akhilesh Yadav

नवी दिल्ली (Akhilesh Yadav) : मुंबईतील रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली. प्रत्येक राज्याच्या मातृभाषेचा आदर आणि संवर्धन झाले पाहिजे; मात्र भाषेचे राजकारण करू नये, असे त्यांनी म्हटले.

भाषेची सक्ती केल्यास देशाच्या भाषिक आणि भावनिक एकतेवर परिणाम होऊन नागरिकांमध्ये दुराव्याची भावना निर्माण होऊ शकते, असा दावा यादव यांनी केला. प्रत्येक व्यक्तीला नवीन भाषा तातडीने शिकणे शक्य नसल्याने अशा अटींमुळे कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो, असे ते म्हणाले. देशभर व्यवसाय करण्याचा घटनात्मक अधिकार असताना भाषिक ज्ञानाची सक्ती योग्य आहे का, असा सवाल (Akhilesh Yadav) त्यांनी उपस्थित केला.

परदेशी कंपन्यांनाही अशीच अट लागू केली जाणार का, असा प्रश्न करत त्यांनी भाजपवर मोठ्या कंपन्यांच्या हिताला प्राधान्य दिल्याचा आरोप केला. रिक्षा व्यवसायाशी संबंधित निर्णयांमागे काही आर्थिक हितसंबंध आहेत का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. भारताची भाषिक विविधता ही देशाची ताकद असून हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी, सिंधी, काश्मिरी, डोगरी, आसामी, मणिपुरी, मिझो, बोडो, संथाली यांसह विविध भाषांचा आदर केला पाहिजे, असे (Akhilesh Yadav) यादव यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
राज ठाकरेंची सूचक पोस्ट; ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ म्हणत नेमका निशाणा कोणावर?

राज ठाकरेंची सूचक पोस्ट; ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ म्हणत नेमका निशाणा कोणावर?

अमित शाहांच्या हिंदी संमेलनातील महाराष्ट्राच्या बहुभाषिकतेवरील वक्तव्यानंतर राज ठाकरेंची सूचक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांच्या टीकेचा रोख कोणाकडे, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

Sep 15, 2026
हिंदीने देशभर काम करण्याची संधी दिली; सावरकर महान भाषाशास्त्रज्ञही होते - अमित शाह

हिंदीने देशभर काम करण्याची संधी दिली; सावरकर महान भाषाशास्त्रज्ञही होते - अमित शाह

हिंदी दिनाच्या कार्यक्रमात अमित शाह यांनी हिंदी, मराठी आणि मातृभाषेच्या महत्त्वावर भाष्य करत वीर सावरकरांच्या भाषाशास्त्रीय योगदानाचा विशेष उल्लेख केला.

Sep 14, 2026
डीजे बंदीवर श्रेयस तळपदे स्पष्टच बोलले; ‘सण साजरा करा, पण लोकांना त्रास होता कामा नये’

डीजे बंदीवर श्रेयस तळपदे स्पष्टच बोलले; ‘सण साजरा करा, पण लोकांना त्रास होता कामा नये’

गणेशोत्सवातील डीजेच्या मुद्द्यावर श्रेयस तळपदे यांनी सण साजरे करताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. मराठी भाषा आणि ‘हनुमान अंश’वरही त्यांनी भाष्य केले.

Sep 09, 2026
जरांगे यांनी आंदोलन करू नये ही आमची भूमिका: मंत्री उदय सामंत

जरांगे यांनी आंदोलन करू नये ही आमची भूमिका: मंत्री उदय सामंत

Minister Uday Samant: मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केलेली आहे. प्रसाद लाड चर्चा करत आहेत. विखे पाटील देखील चर्चा करत आहेत. शंभूराजे देसाई देखील चर्चा करत आहेत. त्यांनी काही त्रुटी आम्हाला काढून दिलेले.

Aug 30, 2026