वसमत वाळू माफिया

वसमतमध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच; पथकं झाली गायब

Wasmat sand mafia: वसमत तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीचा धुमाकूळ सुरूच आहे. वाळू माफिया द्वारे वाळू वाहतूक करत आहेत तर पथके गायब आहेत.

वसमतमध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच; पथकं झाली गायब

Wasmat sand mafia

 

एसडीएमच्या मार्गदर्शनाखाली एक हायवा पकडला

वसमत (Wasmat sand mafia) : वसमत तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन वाहतुकीचा धुमाकूळ सुरूच आहे वाळूमाफिया महाकाय हायवा द्वारे वाळू वाहतूक करत आहेत. कारवाई करणारे पथके सुद्धा गायब आहेत. या पार्श्वभूमीवर चार मे रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली एक हायवा पकडण्यात आला आहे. अनेक दिवसानंतर एक हयवा जप्त केला असला तरी, असे शेकडो हायवा वसमत तालुक्यात फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई कोणी करावी हा प्रश्न उपस्थित होत आहे.

वसमतच्या वादग्रस्त तहसीलदार शारदा दळवी यांच्यावर (Wasmat sand mafia) अवैध गौण खनिज प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेली आहे. तहसीलदार निलंबित होण्याची ही पहिलीच नामुष्की वसमत महसूल विभागाने पाहिलेली आहे. तहसीलदाराच्या निलंबनानंतर अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक यावर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा केली होती. मात्र पूर्वीची व्यवस्था पुढेही सुरूच आहे.

ठराविक  हायवा टिप्पर न पकडण्याची व्यवस्था होती ती तर तशीच आहे. मात्र त्यात अजूनही अनेक वाहनांची वाढ झाल्याचेही पहावयास मिळत आहे. अवैध वाळू उपसा वाहतूक व गौण खनिज माती वाहतूक रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेली पथक कागदावर आहेत प्रत्यक्षात कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे तहसील कार्यालय समोरून माती घेऊन शेकडो हायवा आजही राजरोसपणे येजा करतात मातीच्या हायवाची पावती तपासणारी सुद्धा यंत्रणा कार्यान्वित नाही. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरून तहसील कार्यालयासमोरून माती घेऊन शेकडो हायवा भर दिवसा जातात राष्ट्रीय महामार्गाने ओव्हरलोड वाहतूक होते ते सुद्धा कोणी तपासत नाही दोन ब्रासची पावती त्यावर सात ते आठ ब्रास माती वाहतूक होत असते ती सुद्धा कोणी तपासत नाही एवढा गलथान कारभार वसमत तालुक्यात सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर चार मे रोजी कवठा रोड परिसरात रेती वाहतूक करणारा हायवा क्रमांक एम एच 26 सी व्ही 2521 महसूल विभागाच्या पथकाने पकडला आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयात पुढील कारवाईसाठी लावण्यात आलेला आहे. उपविभागीय अधिकारी  विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली  मंडळ अधिकारी राजू क्षीरसागर,शिवानंद झोळगे  ग्राम महसूल अधिकारी राहुल कोल्हे,अमोल इंगळे, सुधीर इंगळे,धुमाळ,गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आता या वाहनावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वसमत तालुक्यात तहसीलदार शारदा दळवी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सुद्धा अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक सुरूचआहे मातीचे शेकडो हायवा दिवसभरातून तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय याच्या समोरून जातात वीटभट्ट्यांवर शेकडो ब्रास मातीचे ढिगारे पडत आहेत. या प्रकाराकडे पाहणारी यंत्रणा वसमत तालुक्यात दिसत नाही नदी घाटावर किती उपसा होतो किती ब्रास उपसा करण्याची परवानगी आहे हे कोणी तपासत नाही रात्रंदिवस उपसा व वाहतूक सुरू आहे. या प्रकाराकडे गांभीर्याने कोणी पाहत नसल्याने वसमत तालुका  गौण खनिज  माफिया यांच्यासाठी सुरक्षित तालुका होऊन बसलेला आहे.

संबंधित सामग्री

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026