परभणी तरुण मृत्यू

परभणीत कंटेनरच्या चाकाखाली चिरडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Parbhani Youth Death: भरधाव वेगात परभणीहून जिंतूरकडे जाणार्‍या कंटेनरच्या चाकाखाली चिरडल्याने परभणी शहरातील दुचाकीस्वार माधव शिवाजीराव वल्लेकर वय २२ वर्षे, राहणार धार रोड

परभणीत कंटेनरच्या चाकाखाली चिरडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Parbhani Youth Death

 

बोरी बसस्थानक परिसरातील घटना; मयत परभणी शहरातील रहिवाशी 

परभणी/बोरी (Parbhani Youth Death) : भरधाव वेगात परभणीहून जिंतूरकडे जाणार्‍या कंटेनरच्या चाकाखाली चिरडल्याने परभणी शहरातील दुचाकीस्वार माधव शिवाजीराव वल्लेकर वय २२ वर्षे, राहणार धार रोड  या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार  २५ मे रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी घडली. याबाबत बोरीच्या पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास चालू आहे. 

जिंतूर तालुक्यातील बोरी येथे साईबाबा बँकेसमोर सदर घटना घडली. भरधाव वेगात असलेला कंटेनर एमएच ६८ डब्ल्यू १८५०परभणीहून बोरी मार्गे जिंतूरकडे जात होता, या दरम्यान परभणीच्या धार रोडवरील रहिवाशी असलेला माधव शिवाजीराव वल्लेकर हा तरुण त्याच्या मंठा येथील बहिणीला भेटण्याकरिता परभणीहून बोरी मार्गे जिंतूरकडे जात होता. याचवेळी सदर तरुणाचा कंटेनरच्या मागच्या चाकात चिरडल्याने मृत्यू झाला.

अपघातात मृत्यू (Parbhani Youth Death) झालेला तरुण हा परभणीच्या नायरा पेट्रोल पंपावर काम करत असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. मित्राची मोटार सायकल घेऊन तो बहिणीकडे जात असताना हा अपघात घडल्याचे त्याच्या नातेवाईकांकडून कळले. या घटनेतील कंटेनरचा चालक फरार झाला आहे. मयत माधव चे पार्थिव बोरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अहमद हुसेन पठाण यांनी शवविच्छेदन करणार असल्याचे सांगितले. बोरी पोलीस ठाण्याचे सपोनि रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, बीट जमादार शेख वसीम, पोलीस हवालदार सय्यद दिलशान, श्रीराम दंडवते घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

मयताच्या आईचा टाहो
या दरम्यान मयत तरुणाची आई मंगलबाई शिवाजीराव वल्लेकर यांनी रुग्णालय परिसरात टाहो फोडला. 'माझ्या मुलाला ठार मारण्यात आले' असे त्या रडत सांगत असल्याने काही काळ वातावरण भावनिक झाले होते. 

घटनेचा तपास होणे गरजेचे 
या (Parbhani Youth Death) घटनेत भरधाव वेगातील कंटेनर च्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची योग्य चौकशी करावी, अशी मागणी मयताचे नातेवाईक व नागरिक करत होते.

संबंधित सामग्री

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026