Sukhbir Singh Badal

नांदेडमध्ये माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला; हल्लेखोरांचा शोध सुरू

महाराष्ट्रातील नांदेडमध्ये शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

नांदेडमध्ये माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला; हल्लेखोरांचा शोध सुरू

Sukhbir Singh Badal

माता साहेब गुरुद्वारा परिसरातील घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध सुरू; हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट

महाराष्ट्रातील नांदेडमध्ये शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. नांदेड शहराजवळील माता साहेब गुरुद्वारा परिसरात हा प्रकार घडला. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर बादल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल हे नांदेड दौर्‍यावर आले असता त्यांच्यावर गुरुवारी दुपारी १.५० च्या सुमारास खंजरने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर नांदेड येथील यशोसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल हे नांदेड जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. गुरुवारी दुपारी ते गुरुद्वारा मातासाहेब देवाजी मुगट ता. मुदखेड येथील दर्शन घेऊन पायर्‍याने खाली येत असताना त्यांच्यावर एका शिख सेवादाराने त्याच्या हातातील खंजर मारून त्यांना जखमी केले आहे.

दरम्यान बादल त्यांच्या सोबत सुरक्षेसाठी असलेले एसपीयुचे पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे हे त्यांच्या बचावासाठी धावुन गेले असता त्यांच्या हाताला सुद्धा जखम झाली आहे. त्यांच्यावर यशोसाई रुग्णालय येथे उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती चांगली आहे. हल्ला करणार्‍या सेवादारास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,  पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधिक्षक डॉ .निलाभ रोहण यांनी रुग्णालयास भेट देऊन बादल यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. यावेळी रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026