पत्नी जीवघेणा हल्ला

पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; पतीविरुद्ध आष्टी पोलिसांत गुन्हा

Wife Brutal Attack: चामोर्शी तालुक्यातील विकासपल्ली येथील एका व्यक्तीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 28) सकाळी बामणपेठ गावाजवळ

पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; पतीविरुद्ध आष्टी पोलिसांत गुन्हा

Wife Brutal Attack

घोट (Wife Brutal Attack) : चामोर्शी तालुक्यातील विकासपल्ली येथील एका व्यक्तीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 28) सकाळी बामणपेठ गावाजवळील जंगल मार्गावर घडली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रजकेश ठाकूर दास (वय 34, रा. विकासपल्ली) याने पत्नी कनिका ब्रजकेश दास ऊर्फ कनिका विश्वजीत मंडल (वय 28) हिला तिच्या नातेवाईक हरिदास अमल गाईन यांच्यासोबत दुचाकीने घरी सोडण्यासाठी जात असताना बामणपेठजवळ अडविले. आरोपीने दुचाकीला पायाने धक्का मारून थांबविले. त्यानंतर अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली व (Wife Brutal Attack) धारदार शस्त्राने कनिका हिच्या पोटावर, मानेवर, दोन्ही हातांवर आणि दोन्ही पायांवर वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. या हल्ल्यात फिर्यादी हरिदास गाईन व सहा वर्षीय आयुष ब्रजकेश दास यांनाही धोका निर्माण झाला.

याप्रकरणी फिर्यादी हरिदास अमल गाईन (वय 25, रा. लगाम, ता. मूलचेरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 183/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109(1), 296 व 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या (Wife Brutal Attack) प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन मस्के करीत असून, पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. जखमी महीलेला ग्रामीण रुग्णालय आष्टी येथून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संघटनेच्या पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.

संबंधित सामग्री

नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होऊन 38 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Sep 05, 2026
बीडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेट्रोल ओतून पेटवल्याचा आरोप; उपचारादरम्यान अनुष्का शिरसाट यांचा मृत्यू

बीडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेट्रोल ओतून पेटवल्याचा आरोप; उपचारादरम्यान अनुष्का शिरसाट यांचा मृत्यू

बीडच्या पिंपळनेर परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Aug 13, 2026
पॉश कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील ६७२ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस

पॉश कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील ६७२ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस

POSH Act Implementation: कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम, २०१३ (पॉश अॅक्ट) मधील तरतुदी तसेच मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशांची अंमलबजावणी..

Aug 07, 2026
तुझे आंघोळ करतानाचे फोटो आहे, म्हणत महिलेचा छळ

तुझे आंघोळ करतानाचे फोटो आहे, म्हणत महिलेचा छळ

Married Women Harassment: २१ वर्षाच्या विवाहित महिला तुझा आंघोळ करताना उघडे फोटो माझ्या मोबाईलसोबत धमकी देत निघाल्याच्या आरोपावर पळून गेल्याबद्दल पोलिसांनी आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

Aug 04, 2026
टीव्ही अभिनेत्री अदिती शर्माची पतीसह सासरच्या तिघांविरोधात तक्रार; कौटुंबिक हिंसाचारासह मानसिक छळाचे गंभीर आरोप

टीव्ही अभिनेत्री अदिती शर्माची पतीसह सासरच्या तिघांविरोधात तक्रार; कौटुंबिक हिंसाचारासह मानसिक छळाचे गंभीर आरोप

टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अदिती शर्मा (वय २९) यांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर आरोप करत मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Aug 02, 2026