अंजनवाडी तरुणी आत्महत्या

अंजनवाडी येथे तरुणीची पाईपला गळफास घेऊन आत्महत्या

Anjanwadi Girl Suicide: अंजनवाडी येथील आरती शांतीराम यांचा घराच्या लोखंडी पाईपल्याचा गळफास घेऊन आत्महत्या झालेली घटना. तिचे कुटुंब आणि समजावण्यावरचा पोलिस तपास होत आहे.

अंजनवाडी येथे तरुणीची पाईपला गळफास घेऊन आत्महत्या

Anjanwadi Girl Suicide

औंढा नागनाथ (Anjanwadi Girl Suicide) : तालुक्यातील अंजनवाडी येथे तरुणीने घरात कोणीही नसताना घरातील पत्राखालील लोखंडी पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात  १४ जून रोजी (Anjanwadi Girl Suicide) आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथे आरती शांतीराम घनसावंत (१७) वर्षे ही तरुणी तिच्या कुटुंबीयासह राहत होती. आई,वडील शेतात काम करीत असून आरती शिक्षण घेत होती. बारावीची परीक्षा देऊन ६७ टक्के गूण घेत ती उत्तीर्ण झाली होती. मात्र आई कामाच्या निमित्ताने शेजारच्या घरी गेली होती. यावेळी घरी कोणीही नसल्याचे लक्षात येताच आरतीने घरातील स्वयंपाक घरात तीन पत्राच्या खालील लोखंडी पाईपला गळफास घेतला. काही वेळात हा प्रकार घरासमोरून जाणार्‍या शेजारच्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली.

यावेळी आजूबाजूचे नागरिक जमा झाले त्यांनी तातडीने आरती हिला खाली काढून उपचारासाठी दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून तिचा मृत्यू झाल्याची जाहीर केले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, जमादार दिलीप नाईक, राजेश ठाकूर, संदीप चंद्रशेखर यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शांती राम घनसावंत यांच्या खबरीवरून (Anjanwadi Girl Suicide) औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. मयत आरतीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले जमादार ठाकूर पुढील तपास करीत आहेत.

संबंधित सामग्री

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

Consumers Hit by Inflation: विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात भर

Sep 30, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

CJP Abhijit Dipke: कॉकरोच जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sep 24, 2026
टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

Tavetola Village Road: पिटेशूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० लोकवस्तीच्या टवेटोला गावाला जोडणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

Aug 31, 2026
वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Vaigaon Person Suicide:  तालुक्यातील वायगाव येथे ५० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील खोलीच्या स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Aug 30, 2026