अहेरी (Ajay Kankadalwar) : नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरेंच्या मारहाण प्रकरणात आरोपी असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना न्यायालयात आज हजर केले असतात न्यायालयाने त्यांना शनिवार दिनांक 13 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती अहेरी पोलिसांकडून प्राप्त आहे. प्रकरणातील बाकी तीन आरोपी फरार असून त्यांची शोध मोहीम पोलिसांकरवी सुरू आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोली पोलिसांनी पथके निर्माण करून अजय (Ajay Kankadalwar) यांना काल अटक केली होती. अखेर 24 तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते.
त्यांना आज न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी प्रकरणाच्या सखोल तपासासाठी व गुन्ह्यातील अधिक पुरावे गोळा करण्यासाठी न्यायालयीन पोलीस कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने पोलिसांचे म्हणणे ऐकून आरोपीला शनिवार 13 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक हर्षल एकरे व त्यांची चमु फरारांचा शोध व गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
Ajay Kankadalwar: माजी जिल्हा परिषद् अधिकारी अजय कंकडालवार यांचा आरोप ‘वैभव पांढरेंचा मारहाण’ प्रकरणातून सनिकेत असल्यामुळे त्यांच्या शनिवारपर्यंत न्यायालयातून पोलिस कोठडी
Ajay Kankadalwar
संबंधित सामग्री
कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त
कलिना जमीन प्रकरणात छगन भुजबळांना मोठा दिलासा. विशेष न्यायालयाने त्यांच्यासह अन्य आरोपींना दोषमुक्त केले.
छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक
लग्नासाठी वारंवार फोन करून दबाव आणि धमक्या दिल्याच्या आरोपानंतर गोंदेगावातील १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. सोयगाव पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर १० तासांत करण वाघला अटक केली.
अमेरिकेत केरळच्या दोन महिलांची निर्घृण हत्या; जवळच्या मैत्रिणीवर संशय
Kerala Womans Murder: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये केरळमधील दोन महिलांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे भारतीय समुदायात खळबळ उडाली...
लातूर महापालिकेतील काम बंद आंदोलन स्थगित!
Latur Municipal Protest: लातूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्या कक्षामध्ये पालिका नगररचना विभागाचे प्रमुख अक्षय तळदकर यांना झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ